Artificial Intelligent: AI मुळे होऊ शकतो नवीन धर्माचा उदय... कॅनडाच्या यूनिवर्सिटीचा अजब गजब सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Artificial Intelligent (AI)

Artificial Intelligent: AI मुळे होऊ शकतो नवीन धर्माचा उदय... कॅनडाच्या यूनिवर्सिटीचा अजब गजब सर्व्हे

Artificial Intelligent (AI) : आपल्या जगात अनेक प्रकारचे धर्म आहेत, आपला भारत देश तर आपल्या वैविध्यामुळे प्रसिद्ध आहे, अशातच एक वेगळाच सर्व्हे समोर आला आहे, कॅनडाच्या मॅनिटोबा यूनिवर्सिटी (University of Manitoba) चे संचालक नील मॅकआर्थर यांनी आपल्या एका आर्टिकलमधून ही शंका मांडली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या काही वर्षात किंवा बहुदा काही महिन्यातच आपल्या समोर एखादा नवीन धर्म प्रस्थापित होऊ शकतो आणि आश्चर्य म्हणजे हा मानवनिर्मित धर्म नसून आर्टिफिश्यल इंटेलीजन्स (AI) आहे अन् त्यांनी हे सिद्ध केले आहे की हे नक्कीच घडू शकते. कसं ते बघूयात.

AI ने आधीच आपल्या कार्यक्षमतेने लोकांना थक्क केलं आहे, हे चॅटबॉट्स अब्जावधी लोक वापरत असल्याने, यापैकी काही वापरकर्ते AI ला उच्च प्रणाली म्हणून बघातील यात काही शंका नाही. त्यात लोक आधीच विविध स्त्रोतांकडून धार्मिक अर्थ शोधतात. उदाहरणार्थ, असे अनेक धर्म आहेत जे मूर्ती किंवा त्यांच्या शिकवणींची पूजा करतात.

हे कसं शक्य आहे?

देव मानण्याच्या संज्ञा सर्वत्र वेगळ्या आहेत, पण त्यात एक गोष्ट सारखी आहे अन् ती म्हणजे देव सर्वोत्तम आहे, अनेक लोकांसाठी AI ही तीच प्रणाली झाली आहे, खरंतर एकाअर्थी ते खरं आहे, कसं ते बघूयात..

१. AI ची बौद्धिक पातळी ही खूप विस्तारलेली आहे, सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी एकाच पोर्टलवर सांगण्याची संधी खरंतर गूगल (Google) सुद्धा देत नाही, अशात त्याचे ज्ञान हे अमर्याद आहे.

२. AI हे सर्जनशीलतेचे उदाहरण आहे, कविता करणे, म्युझिक तयार करणे, पोस्टर बनवणे कोणत्याही शैलीत कोणतीही कला तात्काळ करुन देणे AI ला सहज शक्य आहे, हे कोणत्या चमत्कारापेक्षा वेगळं नाही.

३. सामान्य व्यक्ती त्यांच्या चिंता, शारीरिक वेदना, भूक, लैंगिक इच्छा असे त्याला काहीही जाणवत नाही.

४. रोजच्या जीवनात लोकांना मदत करण्यासाठी AI खूप मार्गदर्शन करते.

५. AI अमर आहे.

AI ताकदवान आहे यात काही शंका नाही अन् याचे धोके जरी आपल्याला माहिती असले तरी AI नक्कीच आपल्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करेल. याचा विरोध करण्यापेक्षा त्याचा उत्तम वापर गरजेचा आहे.

AI धार्मिक श्रद्धेप्रमाणे नेहमीच उत्कृष्ट सौंदर्याच्या गोष्टी घडवू शकते. याने लोकांना कलाकृती निर्माण करण्यासाठी, नवीन मैत्री आणि नवीन समुदाय तयार करण्यासाठी आणि समाजाला चांगल्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करण्यास प्रेरित करु शकते.