esakal | BGMIची रॉयल पासची घोषणा, नवीन सीझन सुरु होणार 'या' तारखेला
sakal

बोलून बातमी शोधा

Battleground Mobile India

BGMIची रॉयल पासची घोषणा, नवीन सीझन सुरु होणार 'या' तारखेला

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (Battleground Mobile India) हा या महिन्याच्या सुरूवातीस अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. जेव्हापासून सी प्लेयर या गेमच्या नवीन सीझनची वाट पाहत होते. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपत आली आहे, गेम निर्माता क्राफ्टनने जाहीर केले आहे की बीजीएमआय (BGMI) प्लेयर्स नवीन सीझनसाठी सज्ज राहाण्यास सांगण्यात आले आहे. (battlegrounds-mobile-india-bgmi-season-20-royal-pass-and-reward-list-revealed)

या दिवशी नवीन सीझन सुरू

बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया सीझन 20 (BGMI Season 20) च्या नावासह डेव्हलपर्सनी नवीन सीझनमध्ये देण्यात आलेल्या सर्व अपडेट आणि बदलांची तपशीलवार माहिती दिली आहे. नवीन सीझनमध्ये एक नवीन रँकिंग सिस्टम, रॉयल पास रोलआउट आणि बरेच काही येईल. पबजी मोबाइल इंडिया (PUBG Mobile India) चे री-लॉन्च वर्जन आयओएस प्लॅटफॉर्मवर अद्याप लाँच केलेली नाही.

रॉयल पास रँकिंगमध्ये बदल

क्राफ्टनने (Krafton) आपल्या अधिकृत साइटवर सांगीतले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सीझन 19 जुलै रोजी संपेल, म्हणजे नवीन सीझन 14 जुलैपासून सुरू होईल. बीजीएमआय सीझन 20 सह, रॉयल पासचे रँकिंग बदलले जाईल. रँकिंग सीझन सिस्टीममध्ये बदल करण्यासाठी BGMIने यापूर्वी पॅच आयोजित केले आहे. क्राफ्टन सांगीतले की एका फेरीमध्ये 3 सीझन असतील आणि प्रत्येक स्तरामध्ये खेळाडूंना अतिरिक्त बक्षिसे देखील मिळतील. पहिल्या चक्रातील प्रत्येक सीझनमध्ये C1S1, C1S2 और C1S3 मोजले जाईल. तर दुसर्‍या चक्रात, प्रत्येक साझनलाC2S1, C2S2, C2S3 मार्क केले जाईल.

हेही वाचा: सार्वजनिक ठिकाणी मोफत WIFI वापरताय?; मग घ्या 'ही' काळजी

दरमहा स्वतंत्र रॉयल पास देणार

क्राफ्टनने घोषित केले की रॉयल पास सीझन 20 पासून सुरू होणार्‍या सीझन मंथली बेसीसवर चालेल. तर, एका रॉयल पासवर दोन महिने घालवण्याऐवजी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (बीजीएमआय) दरमहा वेगळा रॉयल पास देईल. बीजीएमआयचा नवीन सीझन 14 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजता सुरू होईल. रॉयल पास सीझनसाठी Abbreviations मध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. पुढे सीझन 20 चे नाव एम 1, सीझन 21 चे नाव एम 2 असेल.

सीझनसह रॉयल पास देखील बदलेल

बीजीएमआयने खेळाडूंना असा इशारा दिला आहे की रॉयल पास एक सीझनच्या शेवटपर्यंत वापरला जाऊ शकतो. सीझन संपल्यानंतर त्याचा वापर केला जाऊ शकत नाही आणि नवीन सीझन सुरु झाल्यावर पुन्हा पास खरेदी करावी लागेल. रॉयल पास सीझन 19 संपेल तेव्हा रॉयल पास लेवल आणि आरपी दोन्ही रीसेट केले जातील. बीजीएमआय प्लेयर्सनी 14 जुलै रोजी दुपारी 05: 29:59 वाजता सीझन संपण्यापूर्वी सर्व रॉयल पास सीझन 19 रिवॉर्ड्स क्लेम करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Gmail चा पासवर्ड विसरलात? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिकव्हर

loading image