Amazon Sale मध्ये २५ हजारांत खरेदी करा ४३ इंच Smart TV; पाहा यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best 43 inch smart tv under 25000 rupees to buy in india 2022 amazon great republic day sale

Amazon Sale मध्ये २५ हजारांत खरेदी करा ४३ इंच Smart TV; पाहा यादी

Amazon Great Republic Day Sale 2022 : सध्या Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे, या सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर बंपर डिल्स आणि डिस्काउंट ऑफर मिळत आहेत. आज आपण या सेलमध्ये टीव्ही खरेदीवर (TVs) उपलब्ध डील आणि ऑफर्सबद्दल जाणून घेणार आहोत आहोत. या सेलदरम्यान 25,000 रुपयांत स्मार्ट टिव्हीवर मिळणाऱ्या बेस्ट ऑफर्स एकत्रित केल्या आहेत. OnePlus, Redmi, Mi, Amazon Basics, iFFALCON सारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीची यादी पाहूयात ज्या तुम्हाला 25 हजार रुपयांच्या खाली मिळतील.

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान टेलिव्हिजनच्या किमतीत सूट देण्याव्यतिरिक्त, ग्राहकांना SBI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर अतिरिक्त 10% (जास्तीत जास्त 1,250 रुपये) सूट देखील देण्यात येत आहे. या टेलिव्हिजनवर एक्स्चेंज डिस्काउंट देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा कोणताही जुना टीव्ही नवीनसाठी एक्सचेंज केल्यास तुम्हाला काही अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते.

iFFALCON (43 इंच) 4K अल्ट्रा HD 43U61 (2021 मॉडेल)

iFFALCON 4K अल्ट्रा HD 43U61 (2021 मॉडेल) हे या यादीतील एकमेव मॉडेल आहे जे 25,000 रुपयांच्या खाली 4K डिस्प्लेसह येते. हे Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये 23,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते. एसबीआय कार्डवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल.

हा स्मार्ट टीव्ही 60Hz रिफ्रेश रेटसह 4K (3,840x2,160 pixels) डिस्प्लेसह येतो आणि Android TV 9 Pie वर काम करतो. या डिस्प्लेमध्ये HDR10 सपोर्टसह 1,296 मायक्रो डिमिंग झोन फीचर देखील मिळते. टीव्हीचे ऑडिओ आउटपुट एकूण 24W आहे. याशिवाय डॉल्बीचा सपोर्टही त्यात दिला आहे. हा iFFalcon टीव्ही लाइट्स, एसी सारख्या IoT डिव्हाइस कंट्रोल करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. तसेच हा 64 बिट क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेजसह येतो. यामध्ये तुम्हाला 2.4GHz Wi-Fi कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

OnePlus Y Series (43 इंच) स्मार्ट टीव्ही

OnePlus ने गेल्या वर्षी त्याच्या सर्व टीव्ही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या होत्या, त्यानंतर OnePlus Y-Series चे 43-इंच मॉडेल 29,499 रुपयांना विकले जात होते. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान, हा टीव्ही 25,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. यानंतर, ग्राहक एसबीआय कार्डद्वारे 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट देखील घेऊ शकतात.

43-इंच स्क्रीन आकारासह हा OnePlus स्मार्ट टीव्ही Android TV 9 Pie वर चालतो. डिस्प्ले फुल एचडी (FHD) रिझोल्यूशनसह सुसज्ज आहे आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्ट टीव्ही गुगल असिस्टंट, गुगल क्रोमकास्ट आणि गुगल प्ले स्टोअर मध्ये एक्सेस मिळतो. कंटेंट सेंट्रिक व्ह्यूसाठी ऑक्सिजन प्ले इंटरफेस वापरू शकतात. याला 20W साउंड आउटपुट मिळते. यात डॉल्बी अॅटमॉस ऑडिओसाठी सपोर्ट देखील दिला आहे. ब्लूटूथ हेडफोन, स्पीकर किंवा इतर अॅक्सेसरीज या टीव्हीसोबत ब्लूटूथ स्टिरिओ मोडद्वारे जोडल्या जाऊ शकतात. टीव्हीत 64-बिट प्रोसेसर आणि 1GB RAM दिली आहे.

Mi TV 4A 43-इंच Horizon Edition TV (L43M6-EI)

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान Mi TV 4A 43 Horizon Edition हा टिव्ही 24,999 मध्ये विकला जात आहे. एसबीआय कार्डद्वारे या स्मार्ट टीव्हीवर अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. यासह, ग्राहकांना मोफत इन्स्टॉलेशनचा लाभ मिळेल, परंतु वॉल माऊंटची किंमत इन्स्टॉलेशनच्या वेळी भरावी लागेल.

Mi TV 4A 43 Horizon Edition Full-HD Android LED TV (L43M6-EI) Android TV वर चालतो, दोन्ही स्टॉक Android TV यूजर इंटरफेस आणि Xiaomi Patchwall UI प्रायमरी इंटरफेस म्हणून निवडता येतो. याचा डिस्प्ले फुल-एचडी रिझोल्यूशनसह येतो. या टीव्हीमध्ये तुम्हाला क्वाड-कोर प्रोसेसर, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज मिळेल. हा टीव्ही Android TV 9.0 आधारित पॅचवॉलवरही चालतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, तुम्हाला Mi TV 4A Horizon Edition 43-इंच व्हेरिएंटमध्ये एक अतिरिक्त पर्याय मिळेल, तो म्हणजे S/PDIF इंटरफेस. याशिवाय, यात Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ v4.2, 3 HDMI पोर्ट, 2 USB-A पोर्ट, इथरनेट पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील दिला आहे. या टीव्हीमध्ये तुम्हाला 20W स्टीरिओ स्पीकर देखील मिळतील.

हेही वाचा: कोरोना : लसीचा चौथा डोस ओमिक्रॉनवर प्रभावी नाहीच, चाचणीचा अहवाल उघड

AmazonBasics (43 इंच) फायर टीव्ही AB43E10DS

AmazonBasics (43 इंच) फायर टीव्ही AB43E10DS या सेल दरम्यान 22,799 रुपयांना विकला जात आहे. यानंतर, ग्राहक एसबीआय कार्ड डिस्काउंटचा लाभ घेऊन 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकतात.

हा Amazon TV 60Hz रिफ्रेश रेटसह फुल एचडी (FHD) रिझोल्यूशन डिस्प्लेसह येतो. नेहमीच्या टीव्ही प्रमाणे, यात 2 HDMI पोर्ट, ब्लू-रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे. साउंड आउटपुट 20W आहे आणि टीव्ही डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस ट्रू सराउंड साउंडला सपोर्ट करतो. याला फायर टीव्ही ओएस मिळतो आणि ते अलेक्सा आणि अलेक्सा व्हॉईस कंट्रोल सपोर्टसह येते. टीव्ही 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिला आहे आणि त्यात 1GB RAM मिळते.

Redmi (43 इंच) L43M6-RA (2021 मॉडेल)

Redmi L43M6-RA (2021 मॉडेल) Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये 22,999 मध्ये विकले जात आहे. यामध्ये एसबीआय कार्ड वापरुन तुम्ही 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

या रेडमी टीव्हीचे रिझोल्यूशन फुल-एचडी आहे, जे 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. टीव्हीमध्ये 2 HDMI आणि 2 USB पोर्ट आहेत. टीव्ही ब्लूटूथ 5.0 ने सुसज्ज असून साउंड आउटपुट 20W आहे आणि ते डॉल्बी ऑडिओ, डीटीएस व्हर्च्युअल: एक्स आणि डीटीएस-एचडी फीचर्सना सपोर्ट देते. टीव्ही Android TV 11 आणि PatchWall 4 वर चालतो आणि यात इनबिल्ट Chromecast मिळते. पॉवरसाठी, यात क्वाड-कोअर प्रोसेसर तसेच 1GB रॅम दिली आहे. चांगल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल बँड वाय-फाय देण्यात आला आहे.

हेही वाचा: देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; किंमत 28,000 पासून सुरु

Web Title: Best 43 Inch Smart Tv Under 25000 Rupees To Buy In India 2022 Amazon Great Republic Day Sale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amazontv
go to top