धोकादायक 50 पासवर्ड ज्यामुळे होऊ शकते फसवणूक; चेक करा तुम्हीही ठेवलाय का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 16 January 2021

नवीन 50 पासवर्ड धोकादायक लिस्टमध्ये टाकण्यात आले असून ते सहजरित्या हॅक केले जाऊ शकतात

नवी दिल्ली- जर तुम्हाला तुमचा सोशल मीडियावरील डाटा, ऑनलाईन व्यवहाराची माहिती, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड स्ट्राँग ठेवावा लागेल. त्यामुळे तुमचे पासवर्ड कोणी क्रॅक करु शकणार नाही आणि सायबर हल्ल्यापासून तुमचे संरक्षण होईल.  

Traffic Jam: मुंबईपेक्षा पुणे बरे! जाणून घ्या जगातील स्थान

नवीन 50 पासवर्ड धोकादायक लिस्टमध्ये टाकण्यात आले असून ते सहजरित्या हॅक केले जाऊ शकतात. सध्या सायबर हल्ल्याची वारंवारता वाढली आहे. अनेकांचा खासगीपणा भेदण्यात येत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला 4 लाख नवे मालवेर शोधण्यात आले असून दररोज भारतात 375 सायबर अॅटकची नोंद केली जात आहे. त्यामुळे ही धोक्याचा इशारा आहे. 

जागतिक पातळीवर ही आकडेवारी फार मोठी आहे. अशा परिस्थितीत तुमचे तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड, बँक ट्रान्झेक्शनचे पासवर्ड स्ट्राँग ठेवण्याचा सल्ला आहे. तुम्ही जर अधिक धोकायदायक 'Most Dangerous Passwords'यादीतील काही पासवर्ड वापरत असाल तर तात्काळ ते बदला. तसेच या यादीमध्ये दिलेल्या पासवर्डचा अभ्यास करा, जेणेकरुन भविष्याच तुम्ही अशाप्रकारचे मिळतेजुळते पासवर्ड ठेवणार नाही. 

धनंजय मुंडे प्रकरणात मोठी बातमी; टाकलं एक पाऊल मागे, रेणू शर्माने घेतली माघार!

जर तुमच्या बँक अकाऊंटवर सायबर हल्ला झाला तर तुम्हाला पैसे गमवावे लागू शकतात. तसेच सोशल मीडियावर साधारण पासवर्ड ठेवल्याने कोणीही तुमचे अकाऊंट अॅक्सेस करु शकते. अनेकदा सोप्पा पासवर्ड ठेवण्याचा यूझर्सचा कल असतो, पण ते धोकादायक ठरु शकते. अनेक यूझर्स आपल्या नावाचा किंवा मोबाईल क्रमांक पासवर्ड म्हणून ठेवतात. असं केल्याने तो पासवर्ड क्रॅक करणे सोपं असतं.  

पुढे आम्ही 50 पासवर्ड देत आहोत. यातील काही पासवर्ड तुम्ही वापरल असाल तर सायबर गुन्हेहार याचा फायदा घेऊ शकतात.  

picture1, senha, Million2, aaron431, evite, jacket025, omgpop, qqww1122, qwer123456, unknown, chatbooks, 20100728, 5201314, Bangbang123, jobandtalent, default, 123654, ohmnamah23, zing, 10203, 127, party 888888, 888888, 147258, 999999, 159357, 88888888, 789456123, anhyeuem, 1q2w3e, 789456, 6655321, naruto, 123456789a, password123, hunter, 686584, 98, 25, 25, 25, 25.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of these 50 passwords to avoid getting hacked