Smart Ring : बोटने लॉन्च केली 'स्मार्ट रिंग अ‍ॅक्टिव्ह प्लस'; आरोग्याची काळजी घेणारा स्मार्ट पर्याय, किंमत एकदम कमी, एकदा बघाच

boAt Smart Ring Active Plus price features : भारतातील सुप्रसिद्ध कंपनी boAt ने नवी स्मार्ट रिंग Active Plus लाँच केली असून ती आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी उपयुक्त आहे.
boAt Smart Ring Active Plus price features
boAt Smart Ring Active Plus price featuresesakal
Updated on

boAt New Smart Ring : भारतातील अग्रगण्य देसी स्मार्ट वेअरेबल ब्रँड boAt ने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्याधुनिक आणि स्मार्ट पर्याय बाजारात आणला आहे Smart Ring Active Plus. ही अंगठी फक्त फॅशनसाठी नाही, तर आपल्या संपूर्ण आरोग्याच्या देखभालीसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. बोटच्या याआधीच्या रिंगच्या यशस्वी प्रवासानंतर, ही नविन रिंग आणखी सुधारित आणि फीचर पॅक्ड आहे.

काय खास आहे 'boAt Smart Ring Active Plus' मध्ये?

ही स्मार्ट रिंग स्टेनलेस स्टीलपासून तयार केली गेली आहे, जी स्क्रॅच-प्रतिरोधक आणि अल्ट्रा टिकाऊ असल्याचा कंपनीचा दावा आहे. तिचे वजन केवळ ४.७ ग्रॅम असल्याने ती हलकी आणि कंफर्टेबल आहे.
ती तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे

  • मिडनाईट ब्लॅक

  • रोझ गोल्ड

  • रेडियंट सिल्व्हर

ही रिंग वेगवेगळ्या सात आकारांमध्ये (Size 7 ते 12) उपलब्ध आहे, त्यामुळे कोणत्याही हातासाठी योग्य फिट मिळवता येतो.

boAt Smart Ring Active Plus price features
AI Data Theft : मोबाईलमधला AI चोरतोय तुमचा पर्सनल डेटा! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर; कसं सुरक्षित राहाल? जाणून घ्या

फीचर्सची भरमार

  • हृदयाचे ठोके (Heart Rate) आणि हृदयातील बदल ट्रॅक करते

  • SpO2 (ऑक्सिजन लेव्हल), स्ट्रेस आणि त्वचेचे तापमान मोजते

  • झोपेच्या सवयींचे अचूक विश्लेषण करते

  • मल्टी-स्पोर्ट्स मोड ट्रॅकिंग म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी योग्य ट्रॅकिंग

  • कॅमेरा कंट्रोल फीचर केवळ रिंग हलवून फोटो क्लिक करता येते

  • 5ATM रेटिंग धूळ, घाम आणि पाण्यापासून संरक्षण

बॅटरी आणि चार्जिंग

  • एकदा चार्ज केल्यावर ५ दिवस बॅटरी बॅकअप

  • मॅग्नेटिक चार्जिंग केससह एकूण ३० दिवसांपर्यंत वापर

boAt Smart Ring Active Plus price features
Cyber Dost : फसवणुकीचा नवा फंडा! सुरक्षेसाठी लिंक स्कॅन करा असा मेसेज अन् मिनिटांत फोन हॅक, नेमका विषय जाणून घ्या

किंमत आणि उपलब्धता

boAt Smart Ring Active Plus फक्त २९९९ रुपये मध्ये उपलब्ध आहे.
खरेदीसाठी boAt ची अधिकृत वेबसाइट, तसेच Amazon यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही रिंग विक्रीसाठी उपलब्ध आहे.

जे लोक भारी स्मार्टवॉच वापरण्याच्या ऐवजी हलक्या, स्टायलिश आणि प्रभावी पर्यायाचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही स्मार्ट रिंग एक परिपूर्ण पर्याय ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com