esakal | स्वस्तात मस्त! आता इतर कंपन्यांचे महागडे प्लॅन सोडा; BSNLनं आणलाय भन्नाट प्लॅन; जाणून घ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

आज आम्ही तुम्हाला BSNLची अशी योजना आणत आहोत, जी 180 दिवसांच्या म्हणजेच 6 महिन्यांपर्यंतची वैधता घेऊन येईल आणि त्याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल. चला तर मग जाणून घेऊया या प्लँन्सबद्दल. 

आज आम्ही तुम्हाला BSNLची अशी योजना आणत आहोत, जी 180 दिवसांच्या म्हणजेच 6 महिन्यांपर्यंतची वैधता घेऊन येईल आणि त्याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल. चला तर मग जाणून घेऊया या प्लँन्सबद्दल. 

स्वस्तात मस्त! आता इतर कंपन्यांचे महागडे प्लॅन सोडा; BSNLनं आणलाय भन्नाट प्लॅन; जाणून घ्या 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNLचे  प्रीपेड रिचार्ज किमान किंमतीत जास्तीत जास्त व्हॅलिडिटी देतात. BSNLच्या तुलनेत Airtel, Jio आणि VI सारख्या इतर टेलिकॉम कंपन्यांपैकी काही कंपन्या केवळ 84 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटीसह प्लॅन्स आणतात. तर काही कंपन्यांकडे 180 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्लॅन्स असतात.  मात्र आज आम्ही तुम्हाला BSNLची अशी योजना आणत आहोत, जी 180 दिवसांच्या म्हणजेच 6 महिन्यांपर्यंतची वैधता घेऊन येईल आणि त्याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल. चला तर मग जाणून घेऊया या प्लँन्सबद्दल. 

बीएसएनएलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 997 रुपये आहे, जे 180 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला यामध्ये प्रतिदिन 3 जीबी डेटा उपलब्ध मिळणार आहे. या योजनेंतर्गत यूजर्स दररोज 3 जीबी डेटा वापरण्यास सक्षम असतील मात्र इंटरनेटचा वेग निर्धारित डेटा संपल्यानंतर 80 केबीपीएस पर्यंत कमी होईल. 

तुम्हीसुद्धा Google चा Incognito Mode वापरता का? मग ही...

या व्यतिरिक्त, या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना प्रत्येक नेटवर्कवर विनामूल्य व्हॉईस कॉल करता येतील, विशेष म्हणजे रोमिंगमध्येही ही सुविधा उपलब्ध होईल. परंतु दररोज आपण जास्तीत जास्त 250 मिनिटांच्या विनामूल्य कॉलचा आनंद घेऊ शकाल, त्यानंतर बेस प्लॅनच्या आधारे यूजर्सकडून शुल्क आकारल्या जाणार आहे. 

या 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्स दररोज 100 एसएमएस विनामूल्य पाठवू शकतील. BSNLच्या या योजनेत यूजर्सना 180 दिवसांच्या पीआरबीटी आणि लोकधुन सामग्रीची सुविधा देखील मिळेल.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीये का? मग घाबरू नका; अशी नोंदवा तक्रार; न्याय मिळणारच

इतर टेलिकॉम कंपन्यांविषयी जाणून घेतल्यास एअरटेल कंपनी 180 दिवसांपर्यंत रिचार्ज प्लॅन घेऊन येत नाही. तर जिओच्या 180 दिवसांच्या प्लॅनची किंमत 1,206 रुपये आहे. मात्र हे डेटा व्हाउचर आहे. व्ही बद्दल बोलल्यास, VIच्या  180 दिवसांच्या योजनेची किंमत 1,197 रुपये आहे, ज्यामध्ये आपल्याला दररोज केवळ 1.5 जीबी डेटा मिळतो. तर अशा परिस्थितीत बीएसएनएलची ही 997 रुपयांची योजना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसमोर सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध होते.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top