BSNL चा युजर्सला झटका, बंद होत आहे डबल डेटा देणारा हा प्लॅन

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 9 February 2021

बीएसएनएलच्या 109 रुपयांच्या या प्लॅनबरोबर तुम्हाला 10 जीबी डेटा मिळेल. परंतु, हे फक्त मर्यादित काळासाठी आहे.

नवी दिल्ली- सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लि.ने (बीएसएनएल) डिसेंबर 2019 मध्ये 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 109 रुपयांचा एक नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन बाजारात आणला होता. हा प्लॅन मिथ्रम प्लस नावाने लाँच करण्यात आला होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा आणि दररोज 250 मिनिटे व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. परंतु, आता कंपनी स्पेशल ऑफर अंतर्गत 31 मार्चपर्यंतच युजर्सला डबल डेटा देत आहे. म्हणजेच बीएसएनएलच्या 109 रुपयांच्या या प्लॅनबरोबर तुम्हाला 10 जीबी डेटा मिळेल. परंतु, हे फक्त मर्यादित काळासाठी आहे. म्हणजेच 31 मार्च, 2021 पर्यंतच वैध आहे. वास्तवात बीएसएनएल 1 एप्रिलपासून मिथ्रम प्लस प्लॅन बंद करणार आहे.  

बीएसएनएलने 109 रुपयाच्या प्लॅनमध्ये केला हा बदल
बीएसएनएल 109 रुपयांच्या प्लॅनबरोबर 20 दिवसांसाठी 10 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देत आहे. हा प्लॅन अशा ग्राहकांसाठी चांगला आहे, जे आपला बीएसएनएल प्रीपेड नंबर ऍक्टिव्ह ठेवू इच्छितात. हा प्लॅन आता 31 मार्च, 2021 पर्यंतच व्हॅलिड राहील. 

हेही वाचा- चॅट हिस्ट्री न गमावता WhatsApp नंबर कसा बदलाल? जाणून घ्या सोपा पर्याय

हा प्लॅन बंद झाल्यानंतर इतर प्लॅनचा घेता येईल फायदा
टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, बीएसएनएल 1 एप्रिलपासून 109 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद करत आहे. कंपनी हा प्लॅन का बंद करत आहे, याची माहिती अद्याप समजलेली नाही. परंतु, कंपनीने त्यांचा 106 आणि 107 रुपयांच्या प्लॅनची विक्री वाढवण्यासाठी असे केल्याचे सांगितले जाते. बीएसएनएलच्या 106 रुपयांच्या प्लॅनबरोबर 3 जीबी डेटा, 100 मिनिटे मोफत व्हॉइस कॉल, 60 दिवसांसाठी मोफत बीएसएनएल ट्यून्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 100 दिवसांसाठी आहे. 

हेही वाचा- Jio, Airtel, Vi - 200 रुपयांमध्ये अनलिमिडेट कॉलसह डेटा, एक कंपनी देतेय 2 लाखांचा विमा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL Prepaid Plan Double Data Benefit Till 31st March With 109 rupee