Business : घराच्या छतावर सुरू करा हा व्यवसाय, सरकार देईल सबसिडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Business scheme

Business : घराच्या छतावर सुरू करा हा व्यवसाय, सरकार देईल सबसिडी

प्रत्येकालाच नोकरीमध्ये रस नसतो, पण बिझनेस कोणता करायचा हा देखील प्रश्न आहे. कारण बिझनेस म्हटला की भांडवल आलेच, आणि सगळ्यांकडेच एवढे पैसे असतात असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसबाबत सांगणार आहोत ज्यात सरकार तुम्हाला सबसिडी देते. आम्ही सोलर पॅनल (Solar Panel) व्यवसायाबद्दल बोलत आहोत. हे सोलर पॅनल्स कुठेही स्थापित केले जाऊ शकते. तुम्ही ती तुमच्या घराच्या छतावर लावून वीज बनवू शकता आणि वीज विभागाला पुरवू शकता.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

सोलर पॅनेल व्यवसायात तुम्हाला चांगली कमाई होऊ शकते.याचे कारण म्हणजे शहर असो की गाव, सगळीकडेच विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के सबसिडीही मिळते आणि सोलर पॅनल बसवण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.

हेही वाचा: Solar Storm| ‘सौरवादळ’ म्हणजे काय, परिणाम थेट माणसावर होतो?

किती खर्च अपेक्षित ?

सरकार सातत्याने लोकांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. काही राज्यांनी औद्योगिक क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प अनिवार्य केले आहेत. त्यामुळेच तुमच्याकडे सौर उत्पादने (Solar Products) विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचीही मोठी संधी आहे. यामध्ये तुम्ही सोलर पीव्ही, सोलर थर्मल सिस्टीम, सोलर ऍटिक फॅन, सोलर कूलिंग सिस्टीमचा व्यवसाय सुरू करू शकता. विशेष बाब म्हणजे सौरऊर्जेशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून कर्ज मिळते. हा खर्च राज्यानुसार बदलतो. मात्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर अवघ्या 60 ते 70 हजार रुपयांमध्ये एक किलोवॅटचा सोलर प्लांट बसवता येतो.

हेही वाचा: Solar Plant : सौर उर्जा प्लांट उभारायचाय? फॉलो करा 'या' स्टेप्स

सौर पॅनेलचे फायदे

सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्ष असते. तुम्ही हे पॅनल तुमच्या घराच्या छतावर सहज इंस्टॉल करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला वीज मोफत मिळणार आहे. तसेच, तुम्ही बाकी वीज ग्रीडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकू शकता. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले तर दिवसातील 10 तास सूर्यप्रकाश असेल तर ते सुमारे 10 युनिट वीज निर्माण करेल. महिन्याचा हिशोब केला तर दोन किलोवॅटच्या सोलर पॅनलमधून सुमारे 300 युनिट वीजनिर्मिती होईल. तुम्ही सोलर पॅनेल एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकता. सोलर पॅनलच्या मेंटेनन्समध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्याची बॅटरी दर 10 वर्षांनी बदलावी लागेल. त्याची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे.

हेही वाचा: Solar Eclipse 2021 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज, कुठं दिसेल अन् काय काळजी घ्यावी?

एक लाखापर्यंत कमाई

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक खूपच कमी आहे. पण तरीही तुमच्याकडे पैसे नसतील तर अनेक बँका त्यासाठी फायनान्स करतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत एसएमई कर्ज घेऊ शकता. एका अंदाजानुसार, या व्यवसायात एका महिन्यात 30,000 ते 1 लाख रुपये सहज कमावता येईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.