Solar Plant : सौर उर्जा प्लांट उभारायचाय? फॉलो करा 'या' स्टेप्स

नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. म्हणूनच जर तुम्ही सौर उर्जा प्लांट उभारण्याचा विचार करत असाल तर या स्टेप्स फॉलो करा.
Solar Plant
Solar Plantesakal

Solar Plant : नैसर्गिक संपत्ती आपल्याला निसर्गाने मुबलक प्रमाणात दिली आहे. पण त्याचा योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात वापर होणे फार आवश्यक आहे. जेवढे आपण आत्याधुनीक होत आहोत तेवढे निसर्गापासून दूर जात आहोत असे सामान्यपणे बोलले जाते. पण हल्ली लोकांमध्ये जागरूकता वाढली असून गिझर लावण्यापेक्षा सोलर प्लांट लावणे अधिक पसंत करतात. म्हणूनच जर तुम्ही सौर उर्जा प्लांट उभारण्याचा विचार करत असाल तर या स्टेप्स फॉलो करा.

Solar Plant
रुफटॉप सोलर योजनेतून वीज निर्मिती सुरू

या स्टेप्स फॉलो करा

• नॅशनल पोर्टल www.solarrooftop.gov.in येथे स्वतःला नोंदणीकृत करा आणि अर्ज सादर करा. तांत्रिक शक्यतेच्या मंजुरीसाठी संबंधित DISCOM कडे अर्ज ऑनलाईन पाठविण्यात येईल.

• तांत्रिक शक्यता मंजुरी प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलवरील कोणत्याही नोंदणीकृत व्हेंडॉर्सकडून छतावर सौर उर्जा प्लांटची उभारणी करा.

Solar Plant
ठाण्यातील आदिवासी पाड्यांवर लागणार सोलर दिवे !

• उभारणी केल्यावर, तपशील सादर करा आणि नेट मीटरिंगसाठी अर्ज करा.

• प्लॅटच्या तपासणीनंतर संबंधित DISCOM नेट-मीटर बसवील आणि पोर्टलवर अपडेट करील.

• नेट मीटर बसविल्यानंतर, ग्राहक बँक खाते तपशील आणि कॅन्सल चेकची प्रत अपलोडिंग करून अनुदान

Solar Plant
गुळदुवेत सोलर पथदीपाचे लोकार्पण

प्राप्त करण्यासाठी ग्राहक अर्ज करू शकतो

• ३० कामकाजांच्या दिवसांमध्ये ग्राहकाच्या बँक खात्यात केंद्र शासनाचे अनुदान थेट जमा

• प्रत्येक टप्प्यावरील स्टेटसचे अपडेट पोर्टलवर ऑनलाईन ट्रॅक करता येतील.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com