Google Maps new feature:निश्चिंत बाहेर पडा, तुमचे कुटुंब असेल कायम सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Maps new feature

Google Maps new feature: निश्चिंत बाहेर पडा, तुमचे कुटुंब असेल कायम सावध

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला हवं असलेलं ठिकाण मोबाईलवर टाईप करून सर्च केलं की लगेच मिळतं. माहिती नसलेलं ठिकाण सहजासहजी मिळणं शक्य झालंय ते गुगल मॅपमुळे. आपल्याला हव्या असलेल्या पण रस्ता माहिती नसलेल्या ठिकाणी सहज पोहोचण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणारं टूल म्हणजे गुगल मॅप. मात्र आता गुगल मॅपमध्ये काही महत्वाच्या फिचर्सची भर पडली आहे. ज्यामुळे तुम्ही बाहेर पडले तरी तुम्ही सुखरूप असल्याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तिंना मिळत राहिल. (by the help of google map new feature you can get alert when you leave or arrive at locations)

काय आहे नवीन फिचर

आतापर्यंत गुगल मॅपवर हव्या त्या ठिकाणी लोकेशन सेट करत पोहोचणे , नव्या मार्गांचा शोध घेणे तसेच वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोअर करता येणे यांसारख्या गोष्टी शक्य होत्या. मात्र गुगल मॅपमध्ये आलेल्या नव्या फिचरच्या मदतीने आता एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्याची किंवा निघाल्याची माहिती तुमच्या जवळच्या व्यक्तिंना किंवा कुटुंबियांना देऊ शकता. तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करण्याबरोबरच आता तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर किंवा तेथून निघाल्यावर तुमच्या कुटुंबियांना किंवा जवळच्या व्यक्तिंना सतर्क करण्यासाठीच्या सूचना सेट करू शकता.

नव्या फिचरचे फायदे

1. या फिचरमुळे तुमच्या जवळची व्यक्ती कधी आणि कुठे याची माहिती तुम्हाला असेल. तसेच ती व्यक्ती सुखरूप निघाल्याची किंवा पोहोचल्याची माहिती तुम्हाला मिळाल्याने तुमचे समाधान होईल.

2. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास तुमचे मित्रमंडळी किंवा कुटुंब एखाद्या ठिकाणी जाणार असेल आणि त्यांनी त्या ठिकाणाचे लोकेशन आधीच तुम्हाला शेअर केले असेल तर तुम्ही त्या ठिकाणाच्या पत्त्यासाठी सूचना सेट करू शकता.

3. यामुळे तुमचे मित्रमंडळी किंवा कुटुंब त्या ठिकाणी कधी पोहोचले ते तुम्ही बघू शकता. तसेच ते कधी त्या ठिकाणावरून निघाले याचीही सूचना तुम्ही सेट करू शकता.

या फिचरचा लाभ तेच घेऊ शकतात ज्यांनी जाण्याआधी त्यांचं लोकेशन तुम्हाला शेअर करत सहमती दिली असेल. त्यामुळे जर तुम्ही या फिचरद्वारे एखाद्याची गुप्तपणे हेरगिरी करण्याचा विचार केला असेल तर ते मुळात चुकीचं आहे. ज्या व्यक्तिने त्याचे लोकेशन तुमच्याशी शेअर केले असेल त्याला अनेकवेळा त्याच्या रिमाईंडर सुचना जात असतात. गुगल मॅपवर पुश नोटिफिकेशन आणि तुमच्या मेलवरही याबाबतच्या सुचना तुम्हाला मिळत राहातील.

या फिचरबाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास तुमचं लोकेशन कोणाला शेअर करायचं आणि कोणाला नाही यांच कंट्रोल तुमच्या हाती असेल. तसेच तुम्ही एखाद्याला सेटिंग नोटिफिकेशनमध्ये जाऊन ब्लॉकही करू शकता.

Web Title: By The Help Of Google Map New Feature You Can Get Alert When You Leave Or Arrive At Locations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyGoogle map