
आयोगाच्या प्राथमिक चौकशीनुसार असं दिसत आहे की कंपनीने कायद्याच्या कलम चारच्या वेगवेगळ्या अटी आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट केले जाते.
सीसीआयने तब्बल 39 पानी आदेश दिला आहे. यामध्ये म्हटलं की, आयोगाच्या प्राथमिक चौकशीनुसार असं दिसत आहे की कंपनीने कायद्याच्या कलम चारच्या वेगवेगळ्या अटी आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सीसीआयचा हा चौकशी विभाग आहे.
हे वाचा - 'शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही'; लॅपटॉप न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या
गूगलचा व्यवहार हा अन्यायकारक आणि चुकीचा असून प्रतिस्पर्धी अॅपला दुजाभावाची वागणूक दिल्याचं म्हटलं आहे. यामध्ये इतर अॅपसोबत भेदभाव होईल अशा अटी घातल्या आहेत. यातून 'गूगल पे'ला टक्कर देणारी प्रतिस्पर्धी अॅप बाजारात पोहचू दिलं जात नसल्याचं सीसीआयने म्हटलं आहे.
याप्रकरणी अल्फाबेट इंक, गूगल एलएलसी, गूगल आयर्लंड लिमिटेड, गूगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गूगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश सीसीआयने दिले आहेत.