Chameleon Trojan Malware : अँड्रॉईड मोबाईलच्या सर्व सिक्युरिटी भेदतोय नवा मालवेअर; तज्ज्ञांनी दिला इशारा

फेस आयडी, फिंगरप्रिंट अशा गोष्टींना हा मालवेअर डिसेबल करून टाकतो. त्यामुळे मोबाईलची सिक्युरिटी सिस्टीम निकामी होऊन जाते.
Chameleon Trojan Malware
Chameleon Trojan MalwareeSakal

Chameleon Malware in Android :

अँड्रॉईड यूजर्सना सायबर तज्ज्ञांनी एक इशारा दिला आहे. शॅमेलिऑन ट्रोजन नावाचा एक मालवेअर सध्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर हल्ला करत आहे. फोनच्या सर्व सिक्युरिटी भेदून हा मालवेअर फोनमधील पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती सहज चोरत आहे.

सिक्युरिटी सिस्टीम निकामी

विशेष म्हणजे, हा मालवेअर मोबाईमध्ये कुठेही जाऊ शकतो. फेस आयडी, फिंगरप्रिंट अशा गोष्टींना हा मालवेअर (Malware) डिसेबल करून टाकतो. त्यामुळे मोबाईलची सिक्युरिटी सिस्टीम (Security System) निकामी होऊन जाते. थ्रेट फॅब्रिक नावाच्या कंपनीने याबाबत रिपोर्ट दिला आहे.

अँड्रॉईड अ‍ॅप्सचा वापर

शॅमेलिऑन ट्रोजन (Chameleon Trojan) हा मालवेअर फोनमध्ये शिरण्यासाठी गुगलच्या प्लेस्टोअरवरील अ‍ॅप्सचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, गुगल क्रोम आणि इतर सुरक्षित अ‍ॅप्सना चिटकून हा मालवेअर फोनमध्ये येतो. रंग बदलणारा सरडा ज्याप्रमाणे लक्षात न येता एखाद्या गोष्टीवर चिटकून राहू शकतो, त्याप्रमाणेच हा मालवेअर येत असल्यामुळे याला शॅमेलिऑन (Chameleon Malware) असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी देखील हा मालवेअर समोर आला होता, मात्र आता याचं अपडेटेड व्हर्जन पुढे आलं आहे.(Use of Android Apps)

ब्लिपिंग कम्प्युटर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कॅमेलनऑन ट्रोजन बंडलमध्ये रनटाईम डिटेक्ट होत नाही. यामुळेच त्याला मोबाईलवरील गुगल प्रोटेक्ट अलर्ट आणि सिक्युरिटी सॉफ्टवेअर (Security Software) आरामात बायपास करता येतात. याचं पूर्वीचं व्हर्जन हे अ‍ॅक्सेसिबिलिटी फीचरचा वापर करुन घेत होतं. मात्र, नवीन व्हर्जन सुरक्षा सेटिंगमध्ये असणाऱ्या त्रुटींचा वापर करून घेत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.

Chameleon Trojan Malware
Malware : गुगलच्या प्ले-स्टोअरवरुन वर्षभरात 60 कोटींहून अधिक मालवेअर डाऊनलोड; तुमच्या फोनमध्ये नाहीत ना 'हे' अ‍ॅप्स?

काय घ्यावी खबरदारी?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यापासून बचाव (Security Tips) करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे, कोणत्याही वेबसाईटवरुन अ‍ॅप्स डाऊनलोड न करणे. केवळ गुगलच्या प्ले-स्टोअरवरील अ‍ॅप्स सुरक्षित असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसंच ठराविक विश्वासू अ‍ॅप्स वगळता इतरांना अ‍ॅक्सेसिबिलिटी सेटिंगचा अ‍ॅक्सेस न देणं देखील गरजेचं आहे. यासोबतच आपल्या स्मार्टफोनची ओएस अपडेट ठेवल्याने देखील तुम्ही सुरक्षित राहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com