Murder Case : 'या' ॲपमुळं घडताहेत खुनासारख्या क्रूर घटना, वेळीच सावध नाही झालं तर..

डेटिंग ॲप आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ॲपमुळे खुनासारख्या क्रूर घटना घडू लागल्या आहेत.
Online Dating App Fraud
Online Dating App FraudSakal
Summary

क्वॅक क्वॅकने भारतात (India) १८ लाख लोकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये ७८ टक्के सिंगल राहणाऱ्या व्यक्तींनी डेटिंग ॲप वापरत असल्याचे म्हटले आहे.

ही घटना आहे नवी मुंबईतील. एका युवकाची परदेशातील युवतीशी घट्ट मैत्री होते. क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतविण्यास डबल करून देण्याचे आमिष ती त्यास दाखविते. तिचे मन राखण्यासाठी सुरुवातीला तो एक लाख रुपये गुंतवितो. एकाचे दोन लाख मिळतात. दोनाचे चार लाख मिळतात अन्‌ त्याचा विश्‍वास बसतो.

तिच्या सांगण्यावरून तो एक कोटी रुपये गुंतवितो. तो पैसे डबल होण्याची वाट पाहतो. मात्र, पैसे काही बँक खात्यात जमा होत नाहीत. तो तिला फोन करतो. ती पुन्हा ६ लाख रुपये जमा करण्यास सांगते. तो सहा लाख जमा करतो अन्‌ तिच्या फोनची वाट पाहत राहतो; पण तिचा फोनही येत नाही आणि लागतही नाही. या युवकाला फिलिपिन्स देशातील मुलीशी डेटिंग ॲपवरून (Dating App) झालेली मैत्री १ कोटी ६ लाखांना गंडा घालते.

डेटिंग ॲप आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ॲपमुळे खुनासारख्या क्रूर घटना घडू लागल्या आहेत. पालघरमधील श्रद्धाची मर्डर केस हे त्यातीलच एक उदाहरण म्हणता येईल. एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये जाऊन सेलमध्ये मैत्री खरेदी करावी तसा काहीसा हा प्रकार म्हणजे हा डेटिंग ॲप्स आहे. या डेटिंग ॲप्सची आणि वापरकर्त्यांची संख्या आपल्या देशात झपाट्याने वाढत आहे.

Online Dating App Fraud
Nanded : आंबेडकर जयंती केली म्हणून दलित तरुणाची निर्घृण हत्या; अशोक चव्हाण म्हणाले, 'वातावरण खराब करू नका'

या ॲपच्या वापरकर्त्यांमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. वापरकर्त्यांना हे ॲप मोफत आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात २०२२ मध्ये देशात ३१ मिलियन डॉलर म्हणजे २.५५ अब्ज रुपये डेटिंग ॲपच्या वापरासाठी खर्च झाले आहेत. त्यामुळे ॲप कंपन्यांसाठी भारत हे मोठे मार्केट झाल्याचे स्पष्ट होत आहे. डेटिंग ॲप हे व्यक्तीचा एकटेपणा घालविण्यासाठी, मैत्री मिळविण्यासाठी वापरले जात असले तरी प्रत्यक्षात वापरकर्त्यामध्ये खुशी से गम जादा निर्माण होऊ लागल्याचे अभ्यासातून समोर येऊ लागले आहे.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने (University of Western Sydney) डेटिंग ॲप वापरणाऱ्या १८ वर्षावरील ४७५ लोकांचा अभ्यास केला असता जे लोक डेटिंग ॲप वापरतात. त्यांच्यामध्ये हतबलता, चिंता तणाव नैराश्य जास्त दिसून आले. डेटिंग ॲप वापरकर्त्यांमध्ये हा चांगला की तो चांगला हा विचार सतत दबाव निर्माण करतो. विशेषत: यातील कोणतेही नाते जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे अपेक्षाभंग यासारख्या भावना वाढीस लागतात.

Online Dating App Fraud
Akshay Bhalerao Case : आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवलं; कवाडेंचा चव्हाणांवर गंभीर आरोप

शिवाय, हे ॲप वापरणाऱ्या व्यक्तींची क्रयशक्तीही कमी होत असल्याचे या अभ्यासात सिद्ध झाले आहे. जर्नल ऑफ कॉम्प्युटर आणि एज्युकेशनच्या अभ्यासात जी मुले डेटिंग ॲप वापरतात. त्यांच्या ॲकॅडमिक परफॉमर्स कमी होत असल्याचे दिसून आले आहे. मुले डेटिंग ॲपवर स्वाइप, स्क्रोल करत राहतात. त्यामुळे त्यांचा फोकस डिस्टर्ब होतो. त्याचा मुलांच्या परफॉमर्सवर मोठा परिणाम होतो. डेटिंग ॲपवर आपण आयडियल पार्टनर शोधत असतो. त्यामुळे स्वत: आयडियल दिसण्याचा प्रयत्न करत राहतो.

त्याचा परिणाम आपण आपल्या शरीराचा तिरस्कार करू लागतो. स्वत:चे दिसणे, शरीराबद्दल कमीपणा, असमाधान असा नकारात्मक भावना वाढीस लागतात. विशेषत: पुरुषांमध्ये या भावना अधिक वाढीस लागतात. मुलांना स्वत:च्या शरीराबद्दल लाच वाटणे, वजन, आकाराबद्दल नकारात्मक विचार येत राहतात. स्वत:च्या शरीराची इतरांशी तुलना करून स्वत:च्या शरीराबद्दल कमीपणा अथवा असमाधानाची भावना वाढू लागली आहे.

Online Dating App Fraud
Dharashiv : 'तू तुझ्या औकातीत राहा भंगारचोर'; ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला चांगलंच सुनावलं

डेटिंग ॲप वापरणाऱ्या महिलांमध्ये इतरांशी स्वत:च्या दिसण्याची तुलना करणे, असुरक्षितता, चांगल्या गोष्टीचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, मूडमध्ये नकारात्मकता अधिक प्रमाणात वाढीस लागत असल्याचे स्टडी ऑफ सोशल एन्जॉयटी ॲण्ड डिप्रेशन याबाबतच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, गंमत म्हणून जरी आपण डेटिंग ॲप वापरत असले तरी तुमच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.

आपण सतत डेटिंग ॲप वापरत असू आणि त्यावर अवलंबून राहत असू, तर आपण स्वत:च्या जीवनात प्रॉब्लेम निर्माण करत आहोत, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन डेटिंग ॲपमुळे प्रत्यक्षात ऑफलाइन नाते तयार होण्यासाठी काहीही मदत होत नाही. उलट वापरकर्त्यांचा सेल्फ एस्टिम लो होतो. शिवाय डिप्रेशन, एकाकीपणा, हतबलता वाढीस लागते.

Online Dating App Fraud
Women Wrestlers : 'या' कुस्ती महासंघाचा महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा; पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका

क्वॅक क्वॅकने भारतात (India) १८ लाख लोकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये ७८ टक्के सिंगल राहणाऱ्या व्यक्तींनी डेटिंग ॲप वापरत असल्याचे म्हटले आहे. क्वॅक क्वॅकचे सीईओ रवी मित्तल यांनी देशात डेटिंग ॲप वापरकर्त्या युजर्सची संख्या दररोज वाढत चालली आहे. डेटिंग ॲप वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या देशांमध्ये भारत हा जगात ५ व्या स्थानी आहे. जर्मनी, रशिया, युरोप, जपान आणि साउथ कोरिया या देशामध्ये डेटिंग ॲप वापरणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com