WhatsApp Safety : तुमचं व्हॉट्सअ‍ॅप भलतंच कोणी वापरतंय? अकाउंट सेफ ठेवण्यासाठी लगेच चेक करा 'या' गोष्टी

हॅकर्स हॅकिंगचे नवनव्या पद्धतींचा शोध घेत असतात. तेव्हा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप धोक्यात तर नाही ना? हे कसं ओळखाल?
WhatsApp Safety
WhatsApp Safety esakal

WhatsApp Safety : व्हॉट्सअ‍ॅप हे असे अॅप आहे जे हल्ली प्रत्येकाच्या मोबाइमध्ये डाउनलोड असतेच. अँड्रॉइन फोन वापरणारी अशी क्वचितच लोकं असतील जे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फोटोज, व्हिडीओज वापरणे फार सोपे झाले आहे. मात्र डिजीटलायझेनच्या जगात हॅकिंगचा धोकाही तेवढाच जास्त आहे. हॅकर्स हॅकिंगचे नवनव्या पद्धतींचा शोध घेत असतात. तेव्हा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप धोक्यात तर नाही ना? हे कसं ओळखाल?

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असे एक फिचर आहे ज्याद्वारे तुमचे अकाउंट कुठे कुठे लॉग इन आहे हे कळण्यास मदत होईल. या फिचरचे नाव आहे लिंक डिव्हाइस. याच्या मदतीने तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट कुठे कुठे लॉग इन आहे हे सहज कळते. हे चेक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

WhatsApp Safety
WhatsApp Safety Features : व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले नवे सेफ्टी फीचर्स! जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सअ‍ॅप कंपनीकडूनसुद्धा लिंक डिव्हाइवर तुमचे व्हॉट्सअॅप कुठे कुठे लॉइ इन आहे हे नियमित तपासण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सगळ्यात आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर सेटिंगवर जा. त्यानंतर लिंक डिव्हाइसवर जा.

WhatsApp Safety
WhatsApp News : ऑगस्ट महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने बॅन केली 74 लाख खाती; 'ही' आहेत कारणं?

इथे तुमच्यापुढे संपूर्ण लिस्ट येईल ज्यामध्ये तुमचे अकाउंट कुठे कुठे लॉग इन आहे ते कळेल. तुमचे अकाउंट अशा ठिकाणी लॉग इन दिसले जिथे तुमचे लॉग इन नाहीये तर लगेच तिथून लॉग आऊट करा. (Technology)

व्हॉट्सअपचे असे म्हणणे आहे की, जर एखादे अकाउंट ३० दिवसांपेक्षा जास्त काळ डिअॅक्टिवेटेड असेल तर डिव्हाइस ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com