Working Robot : कामगारांपेक्षा रोबोटला मिळतेय अधिक पसंती; एकट्या चीनमध्ये होतोय जगाच्या साडेबारा पट अधिक वापर!

China Robot Workforce : चीनमध्ये मनुष्यबळाची जागा रोबोने घेण्यास सुरूवात केली असून जगाच्या तुलनेत अत्यंत वेगाने हा बदल होत आहे, असा दावा अहवालात केला आहे.
China Working Robot
China Working RoboteSakal

Robots Used in Factory : ‘रोबोटिक’ हा शब्द सध्या सर्व क्षेत्रांत ऐकायला मिळतो. रोबो अर्थात यंत्रमानवाचा वापर उद्योगासह वैद्यकीय, शैक्षणिक व इतर क्षेत्रात वाढत आहे. जगात यंत्रमानवाचा सर्वाधिक वापर चीनमध्ये होत असल्याचे अमेरिकेतील ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशन’ (आयटीआयएफ) या वैचारिक गटाच्या अहवालात नमूद केले आहे. चीनकडे जगाच्या साडेबारापट अधिक यंत्रमानव आहेत. याचाच अर्थ चीनमध्ये मनुष्यबळाची जागा रोबोने घेण्यास सुरूवात केली असून जगाच्या तुलनेत अत्यंत वेगाने हा बदल होत आहे, असा दावा अहवालात केला आहे.

रोबोटिक तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यात चीन सध्या आघाडीवर नसला तरी त्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. चिनी रोबोटिक कंपन्या लवकरच यात सर्वांपुढे जातील, असे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. चीनमध्ये कामगारांना उत्पादनात किती मोबदला मिळतो, याचा विचार करून तेथे ‘ऑटोमेशन’चा वापर अपेक्षेपेक्षा जास्त पटीने होत आहे. चीनमध्ये रोबोचा उपयोग अंदाजापेक्षा साडेबारापटीने अधिक आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण १.६ पट एवढे होते. २०२२ पर्यंत चीनने मोठा पल्ला गाठला आणि रोबो तंत्रज्ञान साडेबारा पटीने वाढविले.

China Working Robot
Tecno Robot Dog at MWC : टेक्नोने सादर केला चक्क रोबोट डॉग.. सोबतच लाँच केले स्मार्टफोन अन् 'गेमिंग एआर'; पाहा व्हिडिओ

अमेरिकेत ७० टक्के वापर

चीनच्या तुलनेत अमेरिका रोबोच्या वापराचे प्रमाण केवळ ७० टक्के आहे. अहवालात प्रमुख कंपन्यांमधील संशोधन आणि जागतिक तज्ज्ञांच्या मतांचही समावेश आहे. चीन सरकारने रोबोटिक्स उद्योगाला प्राधान्य दिल्याने चीनमध्ये रोबोचे उत्पादन आणि वापर वेगाने वाढत असल्याचे आढळून आले.

चीन ही जगातील सर्वात मोठी औद्योगिक रोबो बाजारपेठ आहे. २०२२ मध्ये जगातील सर्व औद्योगिक रोबोंपैकी चीनमध्ये ५२ टक्के रोबोंची स्थापना करण्यात आली आहे. एका दशकापूर्वी हे प्रमाण १४ टक्के होते.’’

- रॉबर्ट डी.ॲटकिन्सन (अध्यक्ष, आयटीआयएफ)

China Working Robot
Saudi Robot : सौदीमधील रोबोटने केलं महिला पत्रकाराशी गैरवर्तन? सोशल मीडियावर पडले दोन गट.. पाहा व्हायरल व्हिडिओ

कोणते देश आहेत आघाडीवर?

रोबोटच्या वापरांमध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. त्यानंतर तैवान, सिंगापूर, हाँगकाँग, जपान, झेक रिपब्लिक, स्लोव्हानिया, कॅनडा, स्वीडन, जर्मनी, स्पेन, अमेरिका आणि स्वित्झर्लंडचा समावेश होतो. या यादीतील टॉप 10 देशांमध्ये भारताचं स्थान नाही हे विशेष. अर्थात, ही आकडेवारी 2022 ची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com