Contactless Card : ATM कार्ड वर वाय-फायचे चिन्ह का असते?

ATM कार्ड वर वाय-फायचे चिन्ह का असते?
What does the WiFi symbol on a debit card mean?
What does the WiFi symbol on a debit card mean?sakal

आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. पण या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. ATM कार्ड हा आपल्या रोजच्या जीवनातला भाग आहे. पण तुमचं कधी ATM कार्डवरील वायफायकडे लक्ष गेलं का? तुम्हाला माहितीये ATM कार्ड वर वाय-फायचे चिन्ह का असते? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (What does the WiFi symbol on a debit card atm card mean )

ATM कार्डवरील Wi-fi चिन्ह हे कॉन्टॅक्ट लेस पेमेंट असते . 2019 मध्ये बँकानी हे नवीन फिचर मार्केटमध्ये आणले होते. कॉन्टॅक्ट लेस कार्ड वापरुन ट्रांसक्शन करू शकता ते पण अगदी PIN न वापरता त्यामुळे या कार्डचे धोकेही तितकेच आहे. फसवणूक करणारे सर्यास पीओएस मशीनच्या साहाय्याने पैसे काढू शकतात. त्यासाठी ओटीपीचीही गरज नसते.

RBI ने सुरवातीला या कार्डद्वारे पेमेंट करण्याची मर्यादा 2,000 रुपये ठरवली होती त्यानंतर ती वाढवून 5000 रुपये करण्यात आली आहे.

What does the WiFi symbol on a debit card mean?
Charge Card : ATM कार्डच्या आकारात आलं चार्जर; काही मिनिटात मोबाईल होणार फुल्ल चार्ज

या कॉन्टॅक्ट लेस कार्डच्या मदतीने तुम्ही 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. अनेक लोकांचा गैरसमज असतो की असे कार्ड वायफाय द्वारे काम करतात म्हणून त्याला वाय-फाय क्रेडिट-डेबिट कार्ड म्हणतात पण हे चुकीचं आहे.

हे कार्ड एफसी म्हणजेच नियर फील्ड कम्युनिकेशन आणि आरएफआयडी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने काम करतात.

What does the WiFi symbol on a debit card mean?
Pakistan ATM : जगातील सर्वात उंचावरील एटीएममध्ये पैशांसाठी कसरत

Wi-fi कॉन्टॅक्ट लेस कार्डचे फायदे

  • पाच हजार पर्यंत पेमेंट करण्यासाठी पिन टाकणे आवश्यक नसतो.

  • पेमेंट पिन न टाकता किंवा कोणत्याही ओटीपी शिवाय सहज होतो.

  • कार्ड स्वाइप न करताही या कार्डद्वारे पेमेंट केला जातो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com