Electric Bike : दुचाकी भंगार झाली? आता नो टेन्शन! जुन्या पेट्रोलवरील दुचाकीचे करा ई-बाइकमध्ये रूपांतर

दरवर्षी हजारो दुचाकी मुदत संपल्याने भंगारात जातात; तसेच अनेकांना पेट्रोल दुचाकीऐवजी ई-बाइक हवी असते.
Turn your old bike into Electric Bike
Turn your old bike into Electric Bike Sakal

दरवर्षी हजारो दुचाकी मुदत संपल्याने भंगारात जातात; तसेच अनेकांना पेट्रोल दुचाकीऐवजी ई-बाइक हवी असते. ग्राहकांच्या याच गरजांचा अभ्यास करून शहरातील दानीश चावडा या तरुणाने भंगारातील तसेच चालू पेट्रोल दुचाकींना इलेक्ट्रीक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचे ‘हावर इंटरप्राइजेस’ नावाने स्टार्टअप थाटले. यात कोणतीही दुचाकी तो ईलेक्ट्रीकमध्ये रूपांतरित करतो. सुरुवातीला त्याने दुचाकींमध्ये केलेले प्रयोग यशस्वी झाले. आता ट्रेड सर्टीफिकेशनसाठी त्याने अर्ज केला आहे.

दानीश हा बी.कॉम तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने या अगोदर ऑटोमोबाइलमध्ये आयटीआय तसेच ईव्ही कोर्स केला. या सोबत त्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे प्रमाणपत्र मिळवले. कोरोनानंतर बाजारात नवीन पेट्रोल वाहनांच्या किमती प्रचंड वाढल्या; तसेच नवीन ईव्ही वाहनांच्या किमतीसुद्धा अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत.

यावर त्याने उपाय शोधत ज्यांच्याकडे भंगार, जुनी दुचाकी असेल तर तिला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम सुरू केले. सुरुवातीला त्याने दोन दुचाकी तयार केल्या. या दुचाकींमध्ये त्याने केलेले बदल यशस्वी झाले. त्यांची रस्त्यावरील चाचणीसुद्धा यशस्वी झाली आहे. दानीशने ट्रेड सर्टीफिकेटसाठी अर्ज केला. वाळूज येथे छोटा प्लॅन्ट तयार केला आहे. येथे वेल्डिंग, कटिंग, हॅण्ड ग्रँड, ड्रील मशीन आणले आहे.

Turn your old bike into Electric Bike
Mahindra XUV400 2024 : महिंद्राने लाँच केली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही! नेक्सॉनला देणार का शॉक?

चार गियरसह अनेक सुरक्षा फिचर

जुन्या दुचाकीचे इंजन, पेट्रोल टाकी काढून त्याचे ईव्हीत रूपांतर केले जाते. तयार झालेल्या दुचाकीच्या पार्टची वर्षभराची वॉरंटीही दिली जाते. यामध्ये मोटार, शार्ट सर्कीट झाल्यास स्विच, मदर बोर्डे, बजेटनुसार बॅटरी दिली जाते. एका चार्जमध्ये ही दुचाकी ७० किलोमीटर चालते. (Many safety features with four gears)

स्कूटीसाठी चार तर बाइकला पाच बॅटरी लावल्या जातात. ज्यांना जास्त ॲव्हरेज हवा आहे त्यांच्यासाठी जास्त किमतीच्या बॅटरी लावल्या जातात. या दुचाकीत सुरक्षा फिचरही आहे. शॉर्ट सर्कीट झाला तर एमसीबी ड्रिप होईल. डिस्प्ले हे बजेटनुसार ग्राहकांना मिळेल; तसेच ग्राहकांना चार्जर मोफत आहे. ही दुचाकी घरी किंवा कुठेही

चार्च करता येते. तिला रिमोट सेन्सर लावला आहे. कुणी हात लावला तरीही अलार्म वाजेल. त्यामुळे दुचाकी चोरी होण्याची शक्यता कमी राहील. ग्राहकांना या दुचाकींसाठी ५० ते ६० हजारांचा खर्च येईल. बुलेट असेल तर त्यासाठी थोडा जास्त खर्च आहे. या दुचाकीला तीन गियर आहे. चवथा गेअर हा रिव्हर्स आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com