
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचं डॉ.एपीजे अब्दुल कलामांशी नातं काय?
भारतात 11 मे हा विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो. भारताने स्वातंत्र्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती केली.या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताने जगात महासत्ता म्हणून एक नवीन ओळख मिळवली. तुम्हाला माहिती आहे का की भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस का साजरा केला जातो? या दिवसाचे डॉ.एपीजे अब्दुल कलामांशी काय नाते आहेत? याविषयी आज जाणून घेऊया. (do you know relation of dr a p j abdul kalam with national technology day)
हेही वाचा: 9 पायलटसह 32 क्रू मेंबर्सच्या रक्तात 'अल्कोहोल'; उड्डाणापूर्वीच पर्दाफाश
1998 मध्ये देशाने प्रसिद्ध पोखरण अणुचाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. हा एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवसाची आठवण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.
हेही वाचा: शून्य सावली म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या तुमच्या शहरात कधी असेल 'Zero Shadow Day'
11 मे 1998 ला काय झालं होतं?
11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली होती. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II ऑपरेशन दरम्यान यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या 'न्यूक्लियर क्लब' मध्ये सहभागी होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला. या कामगिरीचीआठवण म्हणून 11 मे हा तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.
हेही वाचा: राजद्रोहाचे खटले दाखल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
हे मिशन भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील खुप मोठे योगदान होते. या मिशनची जबाबदारी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कडे होती. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यामागे त्यांचे खूप मोठे योगदान आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणूनसुद्धा ओळखले जाते. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम यांचे फार मोठे योगदान आहे.
Web Title: Do You Know Relation Of Dr A P J Abdul Kalam With National Technology Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..