Cyber Crime : तुमच्या बेडरुमच्या गोष्टी थेट जातात गुगलवर? ताबडतोब बंद करा हे फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

Cyber Crime : तुमच्या बेडरुमच्या गोष्टी थेट जातात गुगलवर? ताबडतोब बंद करा हे फीचर

Does Google Listen Your Privet Talks : पहिले लँडलाईन फोन असायचे तेंव्हा ते घरात एका ठिकाणी ठेवलेले असत. पण मोबाईल फोन आपण प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन फिरतो. अगदी वॉशरूम पासून ते बेडरुमपर्यंत सगळीकडेच. पण तुम्ही कधी हे ऑब्झर्व्ह केलं आहे का, की बऱ्याचदा आपण बोलत असतो आणि मध्येच फोनवर जाहीराती दिसायला लागतात.

त्यामुळे गुगल तुमचं बोलणं ऐकतो का? अशी शंका बरेच तज्ज्ञ काढतात. तसं तर गुगल या गोष्टीला विरोध करतं. कंपनी म्हणते आम्ही युझर्सच्या गोष्टी ऐकत नाही. पण स्मार्ट स्पीकर किंवा वॉयस असिस्टंटच्या बाबत असं बघण्यात आलं आहे. अ‍ॅप्पल सिरीज असो किंवा अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा हे सर्वच एका कमांडनंतर अ‍ॅक्टिव्ह होतात. म्हणजेत ok google म्हणताच गुगल वॉयस असिस्टंट यूज करू शकतात.

हेही वाचा: Cyber Crime : कोणी तुमची स्क्रीन रेकॉर्ड तर करत नाही ना? ओळखा या साइन्सने

जशी यांना कमांड दिली की, हे अ‍ॅक्टिव्ह होतात. म्हणजेच हे आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतात. म्हणूनच जेव्हा आपण ok google ही म्हणतो तेव्हा लगेच ते अ‍ॅक्टिव्ह होतात. जर तुम्हालाही असंच वाटत असेल की, हे डिव्हाईस आपलं सगळं बोलणं ऐकत आहे तर तुम्ही हे थांबवू शकतात. त्यासाठी लहानशी गोष्ट करावी लागेल.

हेही वाचा: Cyber Crime : सायबर गुन्हेगारांपासून सावधान! पुण्यात फसवणुकीच्या घटनांत वाढ

कसं बंद करावं?

  • तुमच्या स्मार्टफोनच्या सेटींग्जमध्ये जा.

  • सिक्युरीटी आणि प्रायव्हसी वर क्लिक करा.

  • इथे बऱ्याच सेंसर्सच्या परमीशन बघायला मिळतील.

  • तिथे तुम्ही ठरवू शकतात की, कोणत्या अ‍ॅपला कोणती परमिशन द्यायची.

  • नको असलेल्या अ‍ॅप्सची परमिशन रिमूव्ह करा.

  • त्याचप्रमाणे iOS साठीपण परमिशन रिमुव्हचं ऑप्शन मिळतं.

  • मायक्रोफोनच्या टॉगनला ऑफ करा.