असं कोण पासवर्ड ठेवतंय व्हय? अशी चकू ठरु शकते धोकादायक

password
password

नवी दिल्ली : हल्लीचा जमाना हा टेक्नोसेव्ही जमाना मानला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही टेक्नोलॉजीशी निगडीत झालीय. सगळं काही मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलं आहे. अथवा मोबाईलच्या स्क्रीनवरुनच सगळी कामे सुलभपणे उरकली जातात. मात्र, या सगळ्यासाठीच एक सुरक्षितता आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी पासवर्डची आवश्यकता जरुरी झाली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा पासवर्ड ठेवायचा तर तो लक्षात रहायला हवा, असा विचार करुन बरेचजण सोप्यात सोपा पासवर्ड ठेवतात. जेणेकरुन तो कोणत्याही वेळी लक्षात येईल. मात्र, असं करणं धोक्याचं मानलं जातं. आज या लेखात अशा प्रकारच्या काही पासवर्डबाबत बोलणार आहोत, जे 2020 मधील सर्वांत खराब पासवर्ड म्हणून ओळखले जातात. 

हेही वाचा - नव्या Hyundai i20 चा धमाका; फक्त 20 दिवसांत 20 हजार कार बूक
याबाबतची माहिती पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणाऱ्या एका फर्मने दिलीय. NordPass असं या कंपनीचं नाव आहे. त्यांनी 2020 मधील सर्वांत खराब पासवर्ड्सची यादी जाहीर केली आहे. याबाबत कंपनींचं असं म्हणणं आहे की, असे पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक केले जाऊ शकतात. या वर्षीचे सर्वांत लोकप्रिय पासवर्ड 123456 आणि 123456789 आहेत, तसेच लोकांनी iloveyou, picture1 आणि password सारखेच पासवर्ड ठेवले आहेत. हे सारे पासवर्ड अगदी सहजगत्या क्रॅक केले जाऊ शकतात. 

सहजासहजी क्रॅक होणाऱ्या पासवर्ड्सच्या यादीत आणखी काही पासवर्ड्स समाविष्ट आहेत. NordPass दरवर्षी अशा कमकुवत पासवर्ड्सची यादी जाहीर करते जे सहजगत्या क्रॅक केले जाऊ शकतात. कंपनीने यावर्षी अशा 200 पासवर्ड्सची यादी जाहीर केली आहे, जे अगदीच कॉमन आहेत. अशाप्रकारचे पासवर्ड्स सहजच सायबर अटॅकला बळी पडू शकतात. यामधील काही पासवर्ड्समध्ये 12345678, 111111, 123123, 12345 आणि 1234567890 हे पासवर्ड्स आहेत. हे पासवर्ड्स लोकांद्वारे खुपदा वापरले गेले आहेत. या पासवर्ड्सना सर्वांत कमकुवत पासवर्ड्स म्हटलं जातं. 1234567, qwerty, abc123, Million2, 000000, 1234, aaron431, password1, qqww1122। हे देखील सर्वांत कमकुवत पासवर्ड्स मानले जातात. 

म्हणूनच लोकांना असा सल्ला दिला जातो की ते आपले पासवर्ड्स अत्यंत कॉमन असे ठेवू नयेत. जेणेकरुन त्यांना सायबर अटॅक अथवा हॅकींगपासून वाचता येईल. पासवर्ड्स ठेवताना काही मिक्स्ड कॅरेक्टर्सचा वापर करायला हवा जेणेकरुन तो इतका मजबूत बनेल की सहजासहजी तो क्रॅक करता येणार  नाही. अशाप्रकारच्या पासवर्ड्समध्ये लोअर केस, स्पेशल कॅरेक्टर्स मिळून कोणतातरी वेगळा पासवर्ड्स बनवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com