Electric Car : टाटा नेक्सॉनला टक्कर द्यायला आली ही इलेक्ट्रिक कार! किंमत आहे अगदीच कमी

टाटा मोटर्स म्हणजे भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात सर्वात स्वस्त कार आणणारी कंपनी
Electric Car
Electric Car esakal

Electric Car : टाटा मोटर्स म्हणजे भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात सर्वात स्वस्त कार आणणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. सध्या ही देशातील नंबर वन इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. देशात कंपनीची सर्वात जास्त विकणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा नेक्सॉन ईव्हीच्या यशस्वीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Electric Car
Maruti Jimny : एसयूव्हीच्या ताफ्यात दाखल होणार नवी मारुती जिम्नी! मे महिन्यात धावणार रस्त्यांवर

टाटा आपल्या Tiago आणि Tigor ला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये विक्री करीत आहे. परंतु, कंपनीचे फोकस आपल्या ईव्ही लाइन अपला आणखी विस्तार करण्यावर जोर देत आहे. लवकरच कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार येणार आहे.

Electric Car
Air Conditioner : उन्हाळा सुरू झालाय! घरात ठेवा हा छोटा फॅन

2023 च्या ऑटो एक्सपो मध्ये टाटा मोटर्सने आपली Harrier SUV चे ईव्ही वर्जन आणले होते. जिला लवकरच भारतीय बाजारात आणण्याची शक्यता आहे. हॅरियर ईव्हीला टाटाच्या पोर्टफोलियोत नेक्सॉन ईव्हीच्यावर पोझिशन केली जाईल.

Electric Car
WhatsApp Update : व्हॉट्सअॅप आणणार हटके फीचर, थेट फेसबुकशी होणार कनेक्ट

टाटा मोटर्स आणखी एक इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करीत आहे. ज्याला नेक्सॉनच्या खाली प्लेस केले जाईल. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, टाटा पंच मायक्रो एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणले जावू शकते.

Electric Car
Google Search : गुगलमध्ये होणार मोठा बदल, सर्च इंजिनला मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्हीला 2023 च्या अखेरपर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. ही गाडी Gen 2 (सिग्मा) प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. जी टाटा अल्ट्रोज मध्ये वापरलेले ALFA आर्किटेक्चरचे एक संशोधित आहे. पंच ईव्हीला दोन बॅटरी पॅक ऑप्शन सोबत येण्याची शक्यता आहे.

Electric Car
Twitter : ट्विटरने बीबीसीच्या निःपक्षपातीपणावर उपस्थित केला प्रश्न,वाचा काय आहे प्रकरण

एक बॅटरी बॅक अप Tiago EV प्रमाणे 26kWh आणि दुसरे Nexon EV प्रमाणे 30.2kWh बॅटरी पॅक असू शकतो. पंच ईव्ही सोबत टाटा मोटर्सकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आली नाही. परंतु, याला लाँच केले जावू शकते. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असू शकते. याची अंदाजित किंमत 10 ते 14 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com