HBD Facebook: मार्क झुकेरबर्गची निर्मिती जिने बदलला जगाचा चेहरा-मोहरा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

आपल्याला हे ऐकून धक्का बसेल की, जगात फेसबुकचे जवळपास 250 कोटीहून अधिक युझर्स आहेत.

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आज 17 वर्षांचे झाले आहे. 2004 साली आजच्या दिवशी मार्क झुकरबर्गने हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या तीन मित्रांसह 'फेसबुक'चं लाँचिंग केलं होतं. आणि यानंतर संपूर्ण जगाला व्यक्त होण्यासाठीचा मोठा प्लॅटफॉर्म प्राप्त झाला होता. 

2009 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाले फेसबुक
फेसबुकवर आपण नवे मित्र बनवू शकता. फ्रीमध्ये मॅसेज आणि कॉलदेखील करु शकता. सोबतच आपले फोटो आणि आपली मते देखील व्यक्त करु शकता. सध्या जगातील अब्जावधी लोक फेसबुकवर याप्रकारे कृतीशील राहून आपली मते, आपले फोटोज्, आपल्या दैनंदिन घडामोडी शेअर करतात. आणि एकप्रकारे अब्जावधी लोकांचे हेच जग झाले आहे. झुकेरबर्गने फेसबुकची निर्मिती करुन फक्त स्वत:चेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नशीब बदलले. जगाचा चेहरामोहरा फेसबुकच्या अस्तित्वाने बदलून गेला आहे. फेसबुकनंतर जगभरात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स निर्माण झाले मात्र, फेसबुकचं महत्त्व कमी न होत ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. 

हेही वाचा - 'या सेलिब्रिटीजना लक्झरीत बसवून आंदोलनस्थळी न्या'; संजय राऊतांच व्यक्त केलं सडेतोड मत
फेसबुकशी संबंधित काही धक्कादायक बाबी
आपल्याला हे ऐकून धक्का बसेल की, जगात फेसबुकचे जवळपास 250 कोटीहून अधिक युझर्स आहेत. म्हणजे नीट हिशेब घातला तर या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येकी तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती फेसबुकवर आहे. सर्वाधिक फेसबुक युझर्स भारतातच आहेत. 2019 मध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले. भारतात सध्या 26 कोटी फेसबुक युझर्स आहेत. फेसबुकची भारतातील लोकप्रियतेबाबत बोलायचे झाल्यास भारतात 50 टक्क्यांहून अधिक फेसबुक युझर्स हे 25 वर्षे वयाहून कमी वयाचे आहेत.  जगातील 70 हून अधिक शहरांमध्ये फेसबुकचे ऑफिस आहे. फेसबुकमध्ये 45 हजारहून अधिक पूर्णवेळ कर्मचारी आहेत. अंदाजे दररोज 10 हजार कोटी मॅसेज लिहले जातात. यासोबतच दररोज जवळपास 100 कोटी स्टोरीज् फेसबुकवर शेअर केल्या जातात. तर प्रत्येक मिनिटाला 10 लाख लोक लॉगइन करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook 17 anniversary Mark Zuckerberg launched facebook today