esakal | 'या' क्रमाकांवरुन मेसेज आला असेल तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

'या' क्रमाकांवरुन मेसेज आला असेल तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आजकाल कोरोनामुळे कुठलेही व्यवहार करताना लोक ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करणे पसंत करत आहेत याचा परिणाम म्हणून ऑनलाईन फसवणूकीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन पद्धती पेंमेट केल्याने बर्‍याचदा ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) देखील होतात. एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी अलीकडेच टेलिकॉम ग्राहकांना सायबर फसवणूकींबाबत (Cyber Fraud) सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. (fake-kyc-verification-message-to-airtel-users-know-these-things-avoid-scam)

फसवणूक कशी होते?

वापरकर्त्यांना आता केवायसी व्हेरिफीकेशनसाठी एसएमएस मिळत आहेत. ज्यात असे म्हटले आहे की, जर आपण या मेसेजला रिप्लाय दिला नाही तर तर आपला नंबर 24 तासात ब्लॉक केला जाईल. कंपनी अधिकाऱ्यांच्या नावाने एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अगदी जिओ वापरकर्त्यांना केवायसी पडताळणीसाठी फ्रॉड संदेश पाठवले जात आहेत. ट्विटरवरील बर्‍याच वापरकर्त्यांनी या प्रकारच्या फसवणूकीच्या मेसेज मिळाल्याविषयी सांगितले आहे. अशा फ्रॉड मॅसेजमध्ये वापरकर्त्यांची महत्वाची माहिती मागण्यात येते.

ज्या लोकांकडे एअरटेल सिम कार्ड आहे त्यांच्या मोबाइल नंबरवर 9114204378 वरून एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये प्रिय एयरटेल यूजर, आज आपले सिम बंद केले जाईल. कृपया आपले सिम कार्ड अपडेट करा. ज्यासाठी आपल्याला त्वरित 8582845285 नंबरवर कॉल करावा लागेल. आपला सिम काहीवेळात ब्लॉक केले जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या डिटेल्स त्यांना देता तेव्हा तुमचा डेटा फसवणूक करणाऱ्याना मिळतो आणि तुमची ऑनलाईन फसवणूक केली जाते. यामध्ये तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

हेही वाचा: Instagram मध्ये मोठा बदल; 'या' वापरकर्त्यांचे अकाउंट होणार प्रायव्हेट

फसवणूक टाळाण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

वापरकर्त्यांनी हे लक्षात घ्यावे की, नंबर इश्यू केल्यानंतर टेलिकॉम कंपन्या कुठल्याही प्रकारचे केवायसी व्हेरिफीकेशन करत नाहीत. जरी असे झाले तरी ते अधिकृत चॅनेलद्वारे केले जाते अज्ञात क्रमांकाद्वारे नाही. त्यामुळे तुम्हाला पाठवण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणत्याही क्रमांकावर कॉल करु नये. तसेच या मेसेजकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्याची खबरदारी वापरकर्त्याने घ्यावी.

(fake-kyc-verification-message-to-airtel-users-know-these-things-avoid-scam)

हेही वाचा: टेक्नोहंट : नवे 5G मोबाईल

loading image
go to top