Lionel Messi: सचिनप्रमाणे जगजेत्या मेस्सीकडे आहे लग्झरी कारचे मोठे कलेक्शन, वाचा किंमती

फीफा वर्ल्ड कप जिंकण्याचे लिओनिल मेस्सीचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. जगजेत्या मेस्सीकडे आलिशान कारचा मोठा ताफा देखील आहे.
Lionel Messi
Lionel MessiSakal

Lionel Messi Cars Collection: फीफा वर्ल्ड कपच्या (FIFA World Cup 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले आहे. यासोबतच, वर्ल्ड कप जिंकण्याचे लिओनिल मेस्सीचे स्वप्न देखील साकार झाले. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला.

या वर्ल्ड कपमधील कामगिरीसाठी मेस्सीला सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. मैदानावर प्रतिस्पर्धी संघाची दमछाक करणाऱ्या मेस्सीच्या गॅरेजमध्ये कारचा देखील मोठा ताफा आहे. मेस्सीकडे कोट्यावधी रुपयांच्या आलिशान कार आहेत. ऑडीपासून ते Mercedes सारख्या कंपन्यांच्या गाड्या मेस्सीकडे पाहायला मिळतात. मेस्सीकडे असलेल्या कार कलेक्शनविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

लिओनिल मेस्सीकडे आहे ऑडी कलेक्शन

मेस्सीकडे अनेक शानदार कारचे कलेक्शन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये काही दिवसांपूर्वीच ३ महागड्या ऑडी कारचा समावेश झाला आहे. यामध्ये ऑडी RS6, A7 आणि Q7 लग्झरी कारचा समावेश आहे.

मेस्सीकडे रेंज रोव्हर मॉडेल देखील आहे. त्याच्याकडे Range Rover Vogue अँड स्पोर्ट एडिशन आहे. त्याच्या बेस्ट क्लेक्शनमध्ये Mercedes SLS AMG मॉडेलचा समावेश आहे. याशिवाय, Maserati Gran Turismo MC Stradale कार देखील त्याच्याकडे पाहायला मिळते. मेस्सीकडील सर्वात महागडी कार 4.3L Ferrari F136 E आहे. या सुपरकारमध्ये व्ही८ इंजिन देण्यात आले असून, हे ५०३hp हॉर्स पॉवर जनरेट करते.

Lionel Messi
Lava Smartphone: अवघ्या ७ हजारात आला भारतीय कंपनीचा दमदार स्मार्टफोन, खरेदीवर ३ हजारांचे बड्स एकदम फ्री

याशिवाय, मेस्सीकडे Pagani Huayra Tricolore कार देखील आहे. या कारची किंमत १.७० मिलियन डॉलर आहे.

त्याच्याकडे Cadillac Escalade SUV चे कलेक्शन आहे. ही जगातील सर्वात्तम एसयूव्ही कारपैकी एक आहे. याशिवाय, त्याच्याकडील ताफ्यात Lexus RX 450h आणि मिनी कूपर देखील पाहायला मिळते. लेक्ससची किंमत जवळपास ४६,८०० डॉलर्स आणि मिनी कूपरची किंमत जवळपास २० हजार डॉलर्स आहे. तसेच, त्याच्याकडे ३७ मिलियन डॉलर किंमतीची Ferrari 335 S Spider Scaglietti देखील आहे.

हेही वाचा: Royal Enfield: लडाखच्या रस्त्यावर बुलेटने अचानक घेतला पेट, अन् पुढं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com