

How Hydrogen Fuel Cell Technology Works in the New Train of India
esakal
India's First Hydrogen Train Video : भारतीय रेल्वेच्या इतिहासात हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जींद रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या 'हायड्रोजन पॉवर्ड' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवरून या ट्रेनचा एक मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.