तुमची पहिली कार खरेदी करताय? मग या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या | Car Buying Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Buying Tips

तुमची पहिली कार खरेदी करताय? मग या महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या

Car Buying Tips : आजच्या काळात प्रत्येकजण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळताना दिसत आहे आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक गाडीतून प्रवास करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. जर तुम्ही देखील तुमची पहिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोणती कार घ्यायची आणि कोणती नाही हे ठरवणे वाटते तेवढे सोपे नाही. पण गुंतवणुकीपूर्वी आपण सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण कार ही पुन्हा पुन्हा खरेदी करण्याची गोष्ट नाही. चला तर मग जाणून घेऊया कार खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

डिझेल की पेट्रोल, कोणती गाडी चांगली?

पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार महाग आहेत. पण बऱ्याचदा पेट्रोल कार खरेदी करणे चांगले ठरते. सध्या लोक मोठ्या प्रमाणात आता इलेक्ट्रिक कार खरेदीकडे वळत आहेत, परंतु सध्या अनेक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध नाहीत. तुमच्याकडे तशी सोय झाल्यास तुम्ही इलेक्ट्रिक कारचा देखील विचार करु शकता.

गाडीचे बजेट किती असेल?

कार घेण्याचे तुमचे बजेट किती आहे, म्हणजेच तुम्हाला कार घेण्यासाठी किती पैसे खर्च करायचे आहेत, कारण कार खरेदी करताना तुम्हाला कारची किंमत किती आहे हे लक्षात ठेवावे लागतेच, शिवाय कारचे मायलेज किती असेल हे देखील तपासून घ्या. याशिवाय रोड टॅक्स, इन्शुरन्सचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

कारचे मॉडेल काय असेल?

एकदा तुम्ही तुमचे बजेट ठरवले की, कोणत्या मॉडेलची कार घ्यायची हे तुम्हाला ठरवावे लागेल. कार चार प्रकारात येतात - हॅचबॅक, सेडान, एसयूव्ही आणि एमपीव्ही. याशिवाय यात उपश्रेणी देखील आहेत. त्यामुळे तुम्ही कार कुठल्या कामांसाठी वापरणार आहात यावरुन तुम्हा काराचे मॉडल ठरवू शकता.

कारची रिसेल व्हॅल्यू काय असेल?

कार खरेदी करताना तिचे पुनर्विक्रीचे मूल्य काय आहे, हेही लक्षात ठेवले पाहिजे. कार ही लोकांसाठी एक मोठी गुंतवणूक आहे, पण पुढे विकताना तिची किंमत कमी होत जाते. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की जेव्हाही आमची गाडी बदलण्याची संधी येईळ तेव्हा तुमचे मोठे नुकसान होणार नाही. त्यामुळे यादेखील गोष्टीचा बारकाईने विचार करा.

हेही वाचा: उद्या लॉन्च होणार स्कोडाची दमदार SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कारबद्दल व्यवस्थित रिसर्च करा

कोणती कार घ्यायची आणि त्यासाठी किती पैसे खर्च करायचे हे जेव्हा तुम्हाला माहीत असेल तेव्हा त्याबद्दल नीट बाजारात रीसर्च करा. ओळखींच्या कार विक्रेत्यांशी बोला आणि कारची माहिती गोळा करा, त्यासाठी ऑनलाइन माहिती पाहाणे हा देखील एक चांगला मार्ग असला तरी, आपण शोरूममध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास टेस्ट ड्राइव्ह देखील घ्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile
loading image
go to top