Skoda Kodiaq : उद्या लॉन्च होणार स्कोडाची दमदार SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skoda kodiaq facelift SUV

उद्या लॉन्च होणार स्कोडाची दमदार SUV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Skoda Kodiaq : दिग्गज कार निर्माता स्कोडा उद्या भारतात कोडियाक फेसलिफ्ट SUV लाँच करणार आहे. ही SUV BS6 नॉर्म्समुळे बाहेर काढल्यानंतर जवळपास दोन वर्षांपूर्वी SUV मार्केटमध्ये पुनरागमन करणार आहे. कोडियाक फेसलिफ्ट ही स्कोडाची भारतात या वर्षीची पहिली लाँच होणारी कार असेल. सोमवारी भारतात लॉन्च होणार असलेल्या कोडियाक एसयूव्ही गेल्या वर्षी जागतिक बाजारपेठेत लॉंच करण्यात आले आहे. 2022 स्कोडा कोडियाक (skoda kodiaq)अनेक अपडेट्ससह येईल ज्यामध्ये केबिनच्या आत तसेच इंजीन आणि डिझाइन मध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहेत.

जर आपण त्याच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास, तर नवीन कोडियाकमध्ये सुधारित ग्रिल, नवीन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प सिग्नेचर आणि नवीन बंपर मिळतील. मागील बाजूस, मागील बंपरसह टेल लॅम्प देखील ट्विक केले गेले आहे. एसयूव्हीचे प्रोफाइल काहीसे मागील जनरेशन मॉडेलसारखेच आहे.

फीचर्स काय असतील?

SUV मध्ये अत्याधुनिक डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारख्या फीचर्स देण्यात येतील. सुरक्षेसाठी या फेसलिफ्ट कोडियाकमध्ये नऊ एअर-बॅग देण्यात आल्या आहेत. तसेच ही कार इको, नॉर्मल, स्पोर्ट्स, स्नो आणि इंडिविज्यूअल या पाच ड्राइव्ह मोडमध्ये येण्याची शक्यता आहे.

2022 कोडियाक फ्रंट सीट वेंटिलेशनसह येईल. यात कूलिंग आणि हीटिंग अशा दोन्ही सुविधा असतील. ऑटोमॅटीक क्लायमॅट कंट्रोलमध्ये तीन झोन आहेत. या SUV मध्ये पॅनोरामिक सनरूफ, 12-स्पीकर कॅंटन साउंड सिस्टीम, अॅम्बियंट लाइटिंग आणि अनेक फीचर्स मिळतील. ही कार स्पोर्ट्स कार सारखा ड्रायव्हिंग अनुभव देते.

हेही वाचा: कोरोना : संसदेतील 400 कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे 4 जज पॉझिटिव्ह

मिळेल दमदार इंजिन

पॉवरच्या बाबतीत, 2022 कोडियाक SUV मध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असेल जे 190hp आणि 320Nm पर्यंत पीक टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्सशी जोडले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: सुली डील्सचा मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर याला इंदौरमधून अटक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile
loading image
go to top