Smartphone Offer: iPhone ते Samsung... चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत बेस्टसेलर स्मार्टफोन, ऑफर घ्या जाणून

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Big Saving Days Sale सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, इयरबड्सला तुम्ही खूपच स्वस्तात खरेदी करू शकता.
Flipkart
FlipkartSakal

Flipkart Big Saving Days Sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Big Saving Days Sale सुरू झाला आहे. आजपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, इयरबड्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. Flipkart Big Saving Days Sale मध्ये स्वस्तात मिळणाऱ्या टॉप-५ स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

Samsung Galaxy S21 FE 5G

सॅमसंगच्या या डिव्हाइसची मूळ किंमत ७४,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन फक्त ३९,९९९ रुपये आहे. याशिवाय, फोनवर २ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर्स आणि २०,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास फोनला १८ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या फोनमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Z Flip3 5G

Samsung Galaxy Z Flip3 5G स्मार्टफोनला निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. ९५,९९९ रुपये किंमतीचा हा फोन फक्त ५९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ४ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर्स आणि २०,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. संपूर्ण ऑफरचा हा फोन ३५ हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल. हा फोन फोल्डेबल डिस्प्लेसह येतो.

Flipkart
Cyber Fraud: किडनीचे पैसे सोडाचं, विद्यार्थीनीला बसला १६ लाखांना गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण

Moto Edge 30 Fusion

Moto च्या या फोनची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ३९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनला ३८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, २०,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 888+ प्रोसेसर, ६.५५ इंच HD+ pOLED डिस्प्ले मिळेल.

Google Pixel 7 Pro

या फोनची सुरुवाती किंमत ८४,९९९ रुपये आहे. परंतु, बँक ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोन फक्त ७४,९९९ रुपयात तुमचा होईल. याशिवाय, २५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्ही सेलमध्ये फोनला ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. हँडसेटमध्ये इन-हाउस Tensor G2 चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. याशिवाय, फोटोग्राफीसाठी शानदार देखील मिळेल.

Apple iPhone 13

आयफोन खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये Apple iPhone 13 वर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. ६९,९९० रुपयांच्या फोनला फक्त ६३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहे. यात ए१५ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट मिळतो. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनला खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

हेही वाचा: Mobile Data: माझ्या मोबाईलचं नेट संपलं कसं? संसदेत जोरदार चर्चा, मंत्र्यांनी दिलं मजेशीर उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com