Smart TV Offer: एकच नंबर! अवघ्या २ हजारात घरी न्या Samsung चा ३२ इंच Smart TV, पुन्हा मिळणार नाही अशी संधी

Samsung च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.
Samsung TV
Samsung TVSakal

Offer On Samsung Smart TV: नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची प्लॅन असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. ख्रिसमस, नववर्षाच्या निमित्ताने अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही सेलमध्ये Samsung च्या ३२ इंच स्मार्ट टीव्हीला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या टीव्हीवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Samsung HD Ready LED Smart Tizen TV वर मिळेल बंपर डिस्काउंट

Samsung HD Ready LED Smart Tizen TV ची मूळ किंमत १८,९०० रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर ३१ टक्के डिस्काउंनंतर फक्त १२,९९० रुपयात उपलब्ध आहे. Kotak Bank क्रेडिट कार्ड्स आणि EMI ट्रांजॅक्शनवर १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. तर SBI Credit Card ने पेमेंट केल्यास १,२५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा होईल.

Kotak Bank Debit Card वर १० टक्के, तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट पे लेटरसाठी साइन अप केल्यास ५०० रुपयांचे गिफ्ट कार्ड देखील दिले जाते. तसेच, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास सॅमसंगचा हा टीव्ही फक्त १,९९० रुपयात घरी घेऊन जाऊ शकता.

हेही वाचा: Year Ender 2022: चर्चा तर होणारच! 'या' हटके गॅजेट्सने गाजवले २०२२ वर्ष; फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त

Samsung Smart TV चे फीचर्स

Samsung चा हा टीव्ही ३२ इंच एचडी रेडी डिस्प्लेसह येतो. याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल, रिफ्रेश रेट ५० हर्ट्ज आहे. टीव्ही Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच, Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळेल. ऑडिओसाठी यात २० वॉट ऑडिओ आउटपूट देण्यात आला आहे.

तसेच, Dolby Digital Plus सह ३६० डिग्री साउंड एक्सपीरियन्स मिळेल. विशेष म्हणजे या टीव्हीमध्ये एक पर्सनल कॉम्प्युटर मोड देण्यात आला आहे. याचा वापर करून मायक्रोसॉफ्ट ऑफिस अ‍ॅप्सचा वापर टीव्ही स्क्रीनवर करू शकता. यात स्क्रीन मिररिंग फीचर देखील मिळते.

हेही वाचा: Google's New Feature: डॉक्टरांचे हँडराइटिंग समजत नाही? गुगल आणणार अफलातून फीचर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com