
Flipkart Sale: नववर्षाची खास ऑफर, अवघ्या ६ हजारांच्या बजेटमध्ये मिळतेय वॉशिंग मशीन, पाहा डिटेल्स
Offer On Thomson 7 kg Washer: नववर्षाच्या निमित्ताने अनेकजण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असतात. काहीजण यानिमित्ताने स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, गाडी खरेदी करतात. तुम्ही जर घरात उपयोगी येणारी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वॉशिंग मशीन चांगला पर्याय आहे. अवघ्या ६ हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही वॉशिंग मशीनला घरी घेऊन येऊ शकता.
ई-कॉमर्स साइट Flipkart वर वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक चांगल्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. मात्र, Thomson च्या वॉशिंग मशीनला फक्त ६ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कमी किंमतीत येणाऱ्या या वॉशिंग मशीनवर तुम्हाला आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.
Thomson 7 kg Washer वर मिळेल आकर्षक ऑफर
Flipkart वर Thomson 7 kg Washer खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. या वॉशिंग मशीनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत या वॉशिंग मशीनला घरी घेऊन जाऊ शकता. यामध्ये पॉवरफुल मोटर देण्यात आली असून, याद्वारे कपडे सहज स्वच्छ होतील.
ही एक ऑटोमेटिक वॉशिंग मशीन आहे. आकाराने लहान असल्याने घरातील जास्त जागा देखील अडणार नाही. Thomson च्या या ७ किलो वॉशिंग मशीनची मूळ किंमत ७,९९९ रुपये आहे. परंतु, नववर्षाच्या निमित्ताने ३१ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ५,४९० रुपयात खरेदी करता येईल.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
Thomson च्या या वॉशिंग मशीनमध्ये एकच चेंबर मिळेल. याद्वारे कपडे चांगल्याप्रकारे स्वच्छ होतात. तुम्ही शर्ट, जीन्स देखील वॉशिंग मशीनमध्ये सहज धुवू शकता. यामध्ये ७८० rpm ड्राइंग मशीन देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या निमित्ताने जर तुम्ही घरात उपयोगी येणारी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Thomson 7 kg Washer एक चांगला पर्याय आहे.
हेही वाचा: Elon Musk: इलॉन मस्कच्या कामाच्या पद्धतीवर बिल गेट्स यांची टीका, म्हणाले...