ऑनलाइन खरेदीसाठी 'प्राइस ड्रॉप्स' फीचर; देईल स्वस्त प्रॉडक्टची माहिती

google chrome
google chromeGoogle

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करताना अनेकदा एखादी वस्तू कमी किंमतीत मिळावी यासाठी त्याच्या किंमतीची तुलना इतर वेबसाइट्सवरील किंमतीशी करतात. पण यासाठी बराच वेळ आणि मेहनत लागते. कोणतीही वस्तू स्वस्तात मिळवण्यासाठी ती सगळीकडे शोधत बसणे कंटाळवाणे काम आहे. अनेक ऑनलाइन स्टोअर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्स देखील वापरकर्त्यांसाठी चांगल्या ऑफर जाहीर करतात. अशा ऑफर्स शोधण्यासाठी तसेच त्यांची तुलना करण्यात बराच वेळ घालवावा लागतो. मात्र आता ग्राहकांच्या मदतीसाठी, Google Chrome ने वस्तू/प्रॉडक्ट्सच्या किमती ऑनलाइन ट्रॅक (Track A Price Feature) करण्यासाठी एक नवीन फीचर लॉंच केले आहे, जे वापरुन तुम्ही चांगल्या ऑफर्स मिळवू शकता.

या फीचरची घोषणा करताना, Google Chrome ने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये त्याबद्दल माहिती दिली आहे, 'कीप ट्रॅक ऑफ प्राइस ड्रॉप्स' (Keep Track of Price Drops) हे Android वापरकर्त्यांसाठी एक नवीन मोबाइल फीचर आहे आणि ते युनायटेड स्टेट्समध्ये देखील उपलब्ध असेल. हे फीचर तुमच्या ओपन टॅब ग्रिडमध्ये आयटमची लेटेस्ट किंमत दाखवेल जेणेकरुन तुम्ही त्याची किंमत कधी कमी होते ते पाहू शकाल. क्रोमने पुढे माहिती दिली की, हेच फीचर येत्या आठवड्यात iOS वर देखील लॉन्च होणार आहे.

ग्राहकांना कसा फायदा होईल?

Track Off Price Drop या फीचरमुळे तुम्हाला वेगवेगळ्या साइट्सना भेट देऊन तुम्हाला हव्या त्या प्रॉडक्ट्सच्या किमती बदलल्या आहेत का हे पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करण्याची गरज उरणार नाही. नवीन फीचर टॅब ग्रिडवर नवीन ओव्हरले लागू करेल ज्यामुळे ग्राहकांना मदत होईल, ज्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टची नवीन किंमत तसेच मूळ किंमत देखील दिसेल.

या फीचरमुळे खरेदीदार कोणत्याही वस्तूची कमी झालेली किंमत पाहू शकतील आणि क्रोम अॅपवर किंमतीतील बदल/ प्राइस चेंजचा ट्रॅक ठेवला जाईल. अनेक वेगवेगळ्या टॅबमधील प्रत्येक प्रोडक्ट, टॅब आणि उत्पादनासाठी स्वतंत्र ओव्हरले असेल. ज्याच्या मदतीने वापरकर्ते एकाच वेळी अनेक प्रोडक्टच्या किमती लगेच ट्रॅक करु शकाल.

google chrome
एक लिटर पेट्रोलमध्ये धावतात 26 किमी; पाहा देशातील टॉप मायलेज कार

Google Chrome Track Prize Drop फीचर कसे वापरावे?

1. पहिल्यांदा तुम्हाला अँड्रॉइडवर क्रोम उघडावे लागेल आणि तुम्हाला खरेदी करायचे असलेल्या प्रोडक्टचे एक पेज देखील उघडावे लागेल.

2. यानंतर, तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात असलेल्या थ्री-डॉट मेनूवर जावे लागेल.

3. येथे तुम्हाला नवीन 'Track Price' ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा.

4. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या प्रोडक्टच्या कमी झालेल्या किंमती दिसतील.

हे फीचर फक्त Google Chrome च्या अपडेटेड व्हर्जनवर उपलब्ध आहे.

google chrome
Jio, Airtel, Vi : कोणचा 28 दिवसांचा प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या

मात्र जर Google Chrome च्या अपडेटेड व्हर्जनवर देखील तुम्हाला 'Track Price' ऑप्शन दिसत नसल्यास, तुम्ही खाली दिलेली पध्दत वापरु शकाता.

1. तुमच्या Android डिव्हाइसवर Google Chrome उघडा.

2. पुढे, अॅड्रेस बारमध्ये chrome://flags टाइप करा आणि नंतर एंटर दाबा.

3. तुम्हाला सर्च बारमध्ये "Tab Grid Layout" टाइप करावे लागेल.

4. "टॅब ग्रिड लेआउट" टायटल फ्लॅग अंतर्गत तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनू निवडावा लागेल आणि त्यानंतर "Enabled Price Notifications" वर क्लिक करा.

5. बदल लागू करण्यासाठी फ्लॅग इनेबल केल्यानंतर तुम्हाला ब्राउझर रीस्टार्ट करावे लागेल.

6. Howtogeek.com च्या रिपोर्टनुसार,तुम्ही ओपन टॅबमध्ये कमी झालेल्या किंमती पाहू शकता आणि नोटिफिकेशन देखील मिळवू शकता, त्यासाठी तुम्हाला क्रोमच्या टॉपच्या टॅब चिन्हावार टॅप करावे लागेल

7. तुम्हाला तुमच्या ओपन टॅबच्या तळाशी कमी झालेल्या किंमतीचे नोटिफिकेशन मिळवा? असे विचारले जाईल त्यामध्ये "Get Notified" वर क्लीक करावे लागेल.

8. किमतीत झालेली घट पाहण्यासाठी, पुन्हा नवीन टॅब पेजवरील तीन-डॉट मेनू आयकॉनवर टॅप करा आणि "ट्रैक प्राइस" ऑप्शन निवडा.

9. "Track Price on Tabs " चालू असल्याची खात्री करुन घ्या.

google chrome
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; जाणून घ्या किंमत-फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com