CCI Penalty On Google : गुगलवर आठवडाभरात पुन्हा कारवाई, ठोठावला 936 कोटींचा दंड

गेल्या आठवड्यातच भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला सुमारे 1,338 कोटींचा दंड ठोठावला होता.
google
googlesakal

CCI Penalty On Google :  यूएस कंपनी Google ला सुमारे 936 कोटी रुपये म्हणजेच 113.04 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला सुमारे 1,338 कोटींचा दंड ठोठावला होता.

त्यानंतर आज पुन्हा गुगलवर आठवडाभरात दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस स्पेसमध्ये गैरवापर केल्याचा Google वर आरोप ठेवण्यात आला आहे. 

google
Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद; Vi चा यूजर्सला मोठा झटका

गुगल अँड्रॉइड ओएस (अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम) चालवते आणि व्यवस्थापित करते. शिवाय त्याच्या इतर मालकीच्या ऍप्सला परवाने देते. मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर या ओएस आणि गुगलच्या अॅप्सचा वापर करतात. यानुसार ते मोबाइल अॅप्लिकेशन डिस्ट्रिब्युशन अॅग्रीमेंट (एमएडीए) बरोबर आपले हक्क आणि जबाबदाऱ्या नियंत्रित करण्यासाठी अनेक करार करतात.

google
WhatsApp New Update Released : आता प्रोफाईल पिक्चरवरच दिसणार यूजर्सचं स्टेटस

सीसीआयने गुगलविरूद्ध बातम्यांच्या सामग्रीच्या संदर्भात महसूल सामायिकरणाच्या अन्यायकारक अटींबद्दल तपशीलवार चौकशीचे आदेश दिले होते. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या या आदेशात सीसीआयने म्हटले होते की, या संदर्भात तपास शाखेचे महासंचालक (डीजी) आता एकत्रित तपास अहवाल सादर करतील. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनने तक्रार दाखल केल्यानंतर गुगलविरोधातील हे आदेश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com