Googleचा मोठा निर्णय; Play Store मधून लाखो अ‍ॅप्स करणार गायब

1 नोव्हेंबर 2022 पासून नवीनतम Android फोनमध्ये हे अ‍ॅप्स दिसणार नाहीत.
Playstore
Playstoresakal
Updated on

विविध सोयी सुविधांसाठी आपण गुगल प्ले स्टोअर अनेक प्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोड करु शकतो. Google App Store च्या माध्यमातून आपल्याला विश्वसाहर्ता मिळते. गुगल (Google) अनेक सिक्युरिटी तपासण्यांनंतर गुगल प्ले स्टोअरवर अ‍ॅपला एंट्री देत असतो परंतु अनेक धोकादायक अ‍ॅप्स या सुरक्षा तपासण्यांना मागे टाकतात आणि Google App Store वर एंट्री घेताहेत. Google ने त्याच्या Play Store सूचीमधून लाखो धोकादायक अ‍ॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (google has decided to remove millions of dangerous apps from its Play Store list)

Android वापरकर्त्यांसाठी Play Store वर सूचीबद्ध केलेली अनेक अ‍ॅप्स कालबाह्य झाली आहेत. Google ने हे अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची घोषणा केली आहे. कारण, ते नवीनतम Android ऑपरेटिंग सिस्टम (OS) अपडेटसह नाहीत.

Playstore
सायकल पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर; ४२ वर्षीय व्यक्तीला कोठडी

गुगल प्ले स्टोअरवरील सुमारे 10 असे अ‍ॅप्स वापरकर्त्यांसाठी खूप धोकादायक असल्याचे समोर येताच गुगलने हे 10 असे अ‍ॅप्स Google Play Store वरून काढून टाकले आहेत. मात्र हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये असेल तर तुम्हीदेखील हे अ‍ॅप्स लगेच डिलीट करा.

Playstore
एका चार्जमध्ये 60 KM चालणारी ई-सायकल लॉन्च; किंमत 50 हजारांपेक्षा कमी

या १० अ‍ॅप्सवर यूजर्सचा डेटा चोरल्याचा आरोप आहे. गुगलनी बॅन केलेल्या अ‍ॅप्सच्या मदतीने हॅकर्स युजर्सचे नेमके लोकेशन शोधू शकतात. तसेच या अ‍ॅप्सचा वापर करून ई-मेल, फोन नंबर, पासवर्डची चोरी होऊ शकतात. फसवणुकीच्या घटना घडवू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर लगेच फोनवरून डिलीट करा.

या १० अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

Speed Radar Camera

AI-Moazin Lite (Prayer times)

Wi-Fi Mouse (Remote Control PC)

QR & Barcode Scanner (Developed by AppSource Hub)

Qibla Compass - Ramadan 2022

Simple Weather & Clock Widget (Developed by Difer)

Handcent Next SMS- Text With MMS

Smart kit 360

Full Quran MP3-50 Languages & Translation Audio

Audiosdroid Audio Studio DAW

Playstore
2022 मध्ये सरासरी पगारात 8 ते 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे बदल नोव्हेंबरपासून केले जातील. Google ने 1 नोव्हेंबर 2022 पासून, नवीनतम Android रिलीझ आवृत्तीच्या मागील दोन वर्षांच्या API पातळीसह तयार केलेले अ‍ॅप्स नवीन वापरकर्त्यांना दिसणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com