गुगलचा Google Pixel 5 आणि  Pixel 4a 5G झाला लाँच, जाणून घ्या मोबाईलची फिचर्स आणि किंमत

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 2 October 2020

 गुगलचा प्रमुख स्मार्टफोन असणारा Google Pixel 5 लाँच झाला आहे. नवीन पिक्सेल फोनसह कंपनीने Google Pixel 4a च्या 5G वर्जनची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: गुगलचा प्रमुख स्मार्टफोन असणारा Google Pixel 5 लाँच झाला आहे. नवीन पिक्सेल फोनसह कंपनीने Google Pixel 4a च्या 5G वर्जनची घोषणा केली आहे. Google Pixel 5 आणि Google Pixel 4A 5G भारतात लाँच होणार नाही, पण non-5G Google Pixel 4A भारतात येईल. आता पिक्सेल 4 A भारतात 17 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे. हा हँडसेट 17 तारखेपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

दोन्ही फोनच्या किंमती-
Google Pixel 5 ची किंमत 51 हजार 400 रुपयांपासून सुरू होणार आहे. तर Google Pixel 4A 5G ची किंमत 37 हजारांपासून सुरु होईल.

Paytm नंतर Zomato आणि Swiggy ला गुगलने पाठवली नोटीस

Google Pixel 5-
ड्युअल सिम असलेला गुगल पिक्सेल 5 अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये 6 इंच फुल एचडी+ 1080x2340 पिक्सेल ओलेड डिस्प्ले आहे. पिक्सेलची डेन्सिटी 432 पीपीआय आहे आणि  आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 6 आणि  रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. या हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि 8GB रॅम आहे. गुगल पिक्सेल 5 मध्ये 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. गुगल पिक्सेल 5 मध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर्स आहेत ज्यात अपर्चर एफ/1.7 12.2 मेगापिक्सल आणि अपर्चर f/2.2 16 मेगापिक्सल आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी गुगल पिक्सेल 5 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मध्ये  आहे. फ्रंट आणि रिअर कॅमेरा प्रति सेकंद 60 फ्रेम्समध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. 

हेही वाचा - गुगल लेन्सच्या मदतीने आपण गणिताचे प्रश्न सोडवू शकता

Google Pixel 4a 5G:
ड्युअल सिम Google Pixel 4A 5G अँड्रॉईड 11 वर चालते. फोनमध्ये 6.2 इंचाचा फुल एचडी+  1080x2340 पिक्सेल ओलेड डिस्प्ले आहे. स्क्रीन डेन्सिटी 413 पीपीआय आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास 3 सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आहे. यात रॅम 6 जीबी आहे. फोनमध्ये नॉन-एक्स्पांडेबल 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. Google Pixel 4A 5G मध्ये 12.2 आणि 16 मेगापिक्सलचे दोन रिअर सेन्सर्स आहेत. सेल्फीसाठी या पिक्सेल फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर आहे ज्यात अपर्चर f/2.0 आहे. फोन प्रति सेकंद 60 फ्रेम्सपर्यंत 4K रिझोल्युशन व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.

(edited by-pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google launched Google Pixel and Pixel 4a 5G smartphones