Play Pass भारतात लॉंच; जाहिरातींशिवाय मिळणार 1 हजारांहून जास्त ॲप्स

google launches play pass subscription in india to offer over 1000 apps or games without ads check price
google launches play pass subscription in india to offer over 1000 apps or games without ads check price
Updated on

Google ने सोमवारी Play Store मध्ये Play Pass सेक्शन लॉंच करण्याची घोषणा केली, जे कोणत्याही जाहिरातींशिवाय 1000 हून अधिक ॲप्स आणि गेम ऑफर करेल. वापरकर्ते ठरलेले मासिक किंवा वार्षिक शुल्क देऊन त्याच्या प्रीमियम सेवेचा वापर करु शकातील. Play Pass मध्ये तुम्हाला Action Game, Puzzles, Jungle Adventures, Word Cricket Battle 2, Mountain Valley असे अनेक गेम पाहायला मिळतील. या अंतर्गत यूटर, युनिट कन्व्हर्टर आणि ऑडिओलॅब, फोटो स्टुडिओ प्रो इत्यादी हेल्पर ॲप्स देखील सादर केले जातील.

सब्सस्क्रिप्शनची किंमत किती असेल?

Play Pass हे 59 देशांतील डेव्हलपर्सकडून 41 श्रेणींमधील 1,000 हून अधिक टायटल्सचा तयार केलेला हाय क्वालिटी आणि क्युरेटेड संग्रह ऑफर केला जाईल, ज्यात भारतातील अनेक गेम्स आणि App चा समावेश आहे. याच्या सब्सस्क्रिप्शनची सुरुवात ही वापरकर्ते एक महिन्याच्या टेस्टिंगने करू शकतात आणि 99 रुपये प्रति महिना किंवा 889 रुपये देऊन एका वर्षासाठीचे सब्सस्क्रिप्शन घेऊ शकतात. वापरकर्ते 109 रुपयांचे प्रीपेड एक महिन्याचे सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच Play Pass चे सब्सस्क्रिप्शन तुम्हाला इतर पाच सदस्यांसोबत शेअर करता येईल.

google launches play pass subscription in india to offer over 1000 apps or games without ads check price
शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

कंपनीने म्हटले आहे की, आम्ही प्रोडक्ट्स आणि प्रोग्राम वितरीत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो ज्यामुळे Play ग्रुपला फायदा होतो. तसेच यातून वापरकर्ते आणि डेव्हलपर्स या दोघांना फायदा होतो . हे करण्यासाठी आम्ही नेहमीच नवीन मार्ग शोधत असतो. भारतात Play Pass लाँच केल्यावर, आम्ही एक चांगली ऑफर देण्यासाठी उत्सुक आहोत. Google India Play Partnerships चे संचालक आदित्य स्वामी म्हणाले, “आमच्या वापरकर्त्यांसाठी अनलॉक केलेली टायटल्स आणि वापरकर्त्यांना चांगला यूजर एक्सपीरियंस देण्यासाठी आणखी स्थानिक डेव्हलपर्ससोबत भागीदारी करण्याचा विचारात आहोत.

Play Pass फीचर या आठवड्यात देशभरात आणले जाईल. 90 देशांमधील वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेसह, Play Pass सर्व प्रकारच्या ॲप्स आणि गेमच्या भारतीय डेव्हलपर्सना त्यांचा जागतिक वापरकर्ता बेस वाढवण्याची सोबत कमाईची नवीन साधने अनलॉक करण्याची एक संधी देईल, असे निवेदनात म्हटले आहे.

google launches play pass subscription in india to offer over 1000 apps or games without ads check price
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

वापर कसा करणार?

वापरकर्ते Play Store ॲपच्या वरच्या बाजूला उजवीकडे असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करून आणि नंतर Play Pass पर्याय निवडून पास एक्सेस करू शकतात. Play Pass टॅबद्वारे किंवा Play Store वर टायटल्स ब्राउझ करताना Play Pass “तिकीट” (ticket) शोधून सब्सस्क्रायबर्स अॅप्स आणि गेमच्या संग्रह एक्सेस करू शकतात.

google launches play pass subscription in india to offer over 1000 apps or games without ads check price
'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com