मोबाईलवरील मॅपवर १००% विसंबून राहावे का? तज्ज्ञांनी दिले उत्तर!

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत फिलिप पॅक्सन या गृहस्थाचा गुगल मॅप वापर करताना चुकीचा रस्ता दाखविल्याने कार नदीत पडून मृत्यू झाला होता.
Map Story
Map Story esakal

Map Story : घरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला गुगल मॅप वापरणे हा आपल्यातील अनेकांच्या सवयीचा भाग झाला आहे. मात्र मागील काही दिवसांत घडलेल्या घटना पाहता याचा वापर अचूक आणि काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत फिलिप पॅक्सन या गृहस्थाचा गुगल मॅप वापर करताना चुकीचा रस्ता दाखविल्याने कार नदीत पडून मृत्यू झाला होता. जो रस्ता नऊ वर्षापासून नादुरुस्त होता अशा रस्त्यावरून जाण्याचे गुगल मॅपने सुचविले आणि तुटलेल्या पुलावरून गाडी थेट नदीत कोसळली.

तर दोन तीन दिवसांपूर्वी भारतातील केरळमध्ये अशीच घटना घडली. गुगल मॅपने डावीकडे वळावे असा संदेश दिला आणि भर पावसात कार थेट नदीत कोसळली. यात दोन तरुण डॉक्टरांनी प्राण गमावले.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

या घटना का होतात आणि त्या टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत आम्ही आयटी तज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांच्याशी संवाद साधला. डॉ. शिकारपूर म्हणाले, गुगल मॅप चे काम हे सॅटेलाईटच्या माध्यमातून चालते. Satelite मधील डेटा आपल्याला पुरविण्यात येतो. त्यामुळे अचूक माहिती पुरविण्यात अर्थातच मर्यादा येतात. स्थानिक पातळीवर संस्थांची मदत घेतली तर ते अधिक अचूक पद्धतीने करता येईल.

डॉ. शिकारपूर म्हणाले, मुळात आपण हे लक्षात घ्यायला हवं की, कोणतेही ॲप जेव्हा आपण विनाशुल्क वापरतो आहे तेव्हा आपल्याला योग्य सेवा देण्यास ती कंपनी बांधील असेलच असे नाही. कंपन्यांचे मूळ उद्देश डेटा गोळा करणे आणि त्यातून व्यावसायिक फायदा मिळविणे हा आहे. आपण बाहेर पडलो की जवळचे हॉटेल्स, फिरण्याच्या जागा ही ॲप्स सुचवतात.

तुम्हाला याची सवय झाली की, तुमच्या जाण्यायेण्याचा पॅटर्न सेव्ह केला जातो. त्यानुसार तुम्हाला खासगी वाहन सेवा म्हणजे ओला, उबर सारख्या गोष्टी सुचविल्या जातात. या कंपन्या म्हणजे एनजीओ सारखे काम करतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.

डॉ. शिकारपूर म्हणाले, मॅप चा ट्रॅफिक पाहण्यासाठी, अंतराचा अंदाज लावण्यासाठी, वेळचा अंदाज घेण्यासाठी, रस्ता शोधण्यासाठी जरूर करावा परंतु ते करत असताना त्यावर शंभर टक्के विसंबून राहणे योग्य नाही.

Map Story
Bobby Darling : दिल्लीच्या मेट्रोत 'बॉबी'चा राडा, प्रवाशाला मारहाण करुन केली शिवीगाळ! Video Viral

गुगल मॅप चा वापर करताना काय काळजी घ्यावी?

१) मॅप वापरण्याची पूर्ण माहिती जाणून घेऊन मगच मॅप वापर करा

२) तुम्ही जर गुगल मॅप पहिल्यांदा वापरत असाल तर नक्कीच यातील जाणकार व्यक्ती सोबत असेल याचा प्रयत्न करा.

३) तुम्ही कोणत्या प्रकारच्या वाहनाने प्रवास करणार आहात याचा योग्य पर्याय निवडा

४) वळण घेताना जिथे शंका येईल तिथे स्थानिकांशी बोलून त्या माहितीची खात्री करुन घ्या.

Map Story
Viral Video: देशी 'मनी हाईस्ट'! भर रस्त्यात कार आडवी करून तरुणाने उधळले पैसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com