
Google Pixel 7 Unboxing : Google ने 6 ऑक्टोबर रोजी त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 7 लॉन्च केला आहे. हा फोन अॅल्युमिनियम बॉडी डिझाइनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Google Pixel 7 स्नो, ओब्सीडियन आणि लेमनग्रास या तीन रंगांमध्ये उपलब्ध असून, याची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे. पिक्सेल 7 मध्ये Tensor G2 प्रोसेसर Android 13 सह प्रोसेसर सपोर्ट आहे. तसेच, 8 GB रॅमसह फोनमध्ये 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे.
डिझाइन
Pixel 7 सह हा फोन मॅट अॅल्युमिनियम बॉडी डिझाइनसह उपलब्ध आहे. या फोनचे मटेरियल हे रिसायकल मटेरियलपासून बनवल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनची रचना टिकाऊ आणि प्रीमियम अशी असून, फोनला वॉटर रेसिस्टंटसाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. फोनच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण देण्यात आलेले आहे. व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटण फोनच्या उजव्या बाजूला उपलब्ध असून, डिझाईनच्या बाबतीत हा फोन उत्तम आहे.
डिस्प्ले
Pixel 7 मध्ये 6.32 इंचाची फुलएचडी प्लस OLED स्क्रिन जो 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. डिस्प्लेचा स्पर्श आणि स्क्रोलिंग अतिशय स्मूथ आहे.
स्पेसिफिकेशन
Google Pixel 7 मध्ये सुरक्षेसाठी Google च्या Tensor G2 प्रोसेसर आणि Titan M2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 सह उपलब्ध असून, यात 8 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.
कॅमेरा
Google Pixel 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आले असून, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल तर दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलचा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 10.8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. याच्या कॅमेरासह फोटो अनब्लरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बॅटरी
अद्याप कंपनीने Google Pixel 7 च्या बॅटरी क्षमतेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, फोनची बॅटरी फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टेबल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय बॅटरी सेव्हर मोडसह हा फोन 72 तासांपर्यंत चालू शकतो असेही कंपनीचा दावा आहे. Google Pixel 7 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्टला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.