

Google Review Defamation Case: Can a 1-Star Rating Land You in Jail? Madras High Court Explains
eSakal
लेखक - अॅड. चैतन्य धारूरकर
आपण हॉटेलात जातो; जेवण आवडल्यास तिथल्या व्यवस्थापकास सांगतो, न आवडल्यास तसे सांगतो. नवीन कार घ्यायला म्हणून शोरूममध्ये जातो, तेथील सेवा आवडल्यास मित्रांमध्ये तशी स्तुती करतो. प्रसंगी काही खटकल्यास तशी तक्रार करतो. पण, हेच जर आपण इंटरनेटच्या सार्वजनिक व्यासपीठावर जगासमोर करायला लागलो, तर त्याने संबंधित सेवा पुरवणारी व्यक्ती, दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना 'आपली बदनामी झाली' म्हणून तक्रार करू शकतात का? अप्रिय 'गुगल रिव्ह्यू' दिला म्हणून एखादी व्यक्ती किंवा संस्था त्याबाबत 'बदनामी' किंवा 'अब्रू नुकसानी'ची तक्रार करू शकते का?