
Google ने Pixel 6 आणि Pixel 6 Pro हा त्यांचा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मात्र लॉन्च झाल्याच्या काही मिनिटांतच गुगल स्टोअर क्रॅश झाले आणि वापरकर्त्यांना वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. या स्मार्टफोनची वाट पाहाणाऱ्या जगभरातील ग्राहकांनी या फोनवर लॉंच झाल्याबरोबर स्मार्टफोन पाहाण्यासाठी किंवा प्री-ऑर्डर करण्यासाठी सर्च केला, त्यामुळे कंपनीची वेबसाइट क्रॅश झाली. मात्र गुगलने वेबसाईट क्रॅश हेण्यामागे वाढलेले ट्राफीक होते का याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
गुगलने नुकतेच आपले दोन नवीन फोन -Pixel 6 आणि Pixel 6 Pro लाँच केले. दोन्ही स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान Pixel 6 ची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी $ 599 (45 हजार रुपये) आणि 256GB व्हेरिएंटसाठी $ 699 (52,516 रुपये) निश्चीत करण्यात आली आहे. तर पिक्सेल 6 प्रो ची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी $ 899 (67,542 रुपये) आहे. दोन्ही फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत आणि ते 28 ऑक्टोबर रोजी खरेदीसाठी उपलब्ध होतील.
पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो ची स्पेसिफिकेशन्स
Pixel 6 मध्ये तुम्हाला 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.4-इंच एफएचडी+ स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे, तर Pixel 6 Pro मध्ये तुम्हाला QHD+ LTPO डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.7-इंच स्क्रीन दिली आहे. दोन्ही फोनमध्ये गोरिल्ला ग्लास व्हिक्टस आहे, जे स्क्रॅचपासून संरक्षण करेल. Tensor प्रोसेसर हा गुगलचा पहिला स्मार्टफोन चिपसेट आहे. SoC मध्ये 2 हाय परफॉर्मंस कोर, 2 मिड-कोर आणि 4 हाई-इफिशीयंट कोर देण्यात आल्या आहेत. यात 20-कोर GPU देखील आहे. स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर असलेल्या पिक्सेल 5 च्या तुलनेत, कंपनीच्या दाव्यानुसार टेन्सर चिपसेटमध्ये 80% फास्ट आहे. CPU परफॉर्मंन्स 370% फास्ट आहे.
पिक्सेल 6 प्रो ची चिप 12 जीबी रॅम आणि 128 जीबी, 256 जीबी किंवा 512 जीबी स्टोरेजसह जोडलेली आहे तर पिक्सेल 6 मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी किंवा 256 जीबी UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. दोन्ही पिक्सेल 6 सिरीजमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि टायटन एम 2 सिक्युरिटी चिप आहे. यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट (एक नॅनो-सिम आणि एक ईएसआयएम), वायफाय 6 ई, स्टीरिओ स्पीकर्स, IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट कोटिंग देण्यात आली आहे.
Pixel 6 Pro मध्ये 5003mAh ची बॅटरी आहे आणि Pixel 6 मध्ये 4614mAh ची बॅटरी दिली असून दोन्ही फोन 30W फास्ट वायर्ड चार्जिंग, फास्ट वायरलेस चार्जिंग (Pixel 6 वर 21W आणि Pixel 6 Pro वर 23W Pixel Stand वापरून) सपोर्ट करतात. पिक्सेल 6 सिरीज अँड्रॉइड 12 चा आऊट ऑफ द बॉक्स वर चालते आणि त्याला 5 वर्ष सुरक्षा अपडेट मिळतील
Pixel 6 आणि Pixel 6 Pro कॅमेरा
दोन्ही फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा तसेच 12MP f/2.2 अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा 114 ° फील्ड ऑफ व्हयूसह देण्यात आला आहे. 50MP सेन्सरमध्ये 82° फील्ड व्ह्यू f/1.85 अपर्चर आणि 1/1.31 ”सेन्सर आकार दिला आहे. पिक्सेल 6 प्रो मध्ये तिसरा रियर कॅमेरा टेलीफोटो लेन्ससह येतो जो 48 एमपी सेंसर जो 4x ऑप्टिकल झूम फीचर देतो. फ्रंट फेसिंग कॅमेरा प्रो मॉडेलव 11.1MP सेन्सर आणि नॉन-प्रो व्हेरिएंटवर 8MP सेंसर देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.