
सरकारने सायबर सुरक्षेसाठी पासवर्डसंबंधी ५ महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मजबूत व अद्वितीय पासवर्ड ठेवणे आणि तो नियमितपणे बदलणे आवश्यक आहे.
सार्वजनिक Wi-Fi वापरताना आर्थिक व्यवहार टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, भारत सरकारने सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करताना वापरकर्त्यांनी पासवर्डशी संबंधित काही अत्यावश्यक सवयी आत्मसात केल्या तर त्यांच्या बँकिंग, सोशल मीडिया आणि अन्य डिजिटल खात्यांची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलने (NCCRP) दिलेल्या माहितीनुसार, दररोज देशात ६००० पेक्षा अधिक नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत.
मजबूत आणि गुंतागुंतीचा पासवर्ड तयार करा
पासवर्डमध्ये मोठ्या आणि छोट्या अक्षरांचा समावेश असावा. त्यात संख्या आणि स्पेशल कॅरेक्टर्स (@, #, $, % वगैरे) यांचा वापर करावा. किमान ८ अक्षरांचा पासवर्ड आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून पासवर्ड हॅकचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे जास्त लांबीचा आणि क्लिष्ट पासवर्ड अधिक सुरक्षित ठरतो.
वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा
अनेक वापरकर्ते एकच पासवर्ड सोशल मीडिया, बँकिंग व इतर खात्यांमध्ये वापरतात. हे चुकीचे आहे. एकदा पासवर्ड फोडला गेला, तर सर्व खात्यांचा धोका वाढतो. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड असावा.
कधीही पासवर्ड, OTP, PIN किंवा CVV शेअर करू नका
तुमचा पासवर्ड, OTP, बँकेचा PIN किंवा कार्डचा CVV नंबर कोणीही विचारला, तरी तो कधीही शेअर करू नये. कोणताही अधिकारी किंवा बँक कर्मचारी हे विचारत नाही. असे विचारले गेल्यास, तो सायबर फसवणुकीचा भाग असतो.
पासवर्ड नियमितपणे बदला
आपले सोशल मीडिया आणि बँक खात्यांचे पासवर्ड दर काही काळानंतर बदलत राहा. यामुळे पासवर्ड लीक झाल्यास किंवा कुणी ओळखण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांची योजना फसेल.
जागतिक किंवा सार्वजनिक Wi-Fi वापरताना आर्थिक व्यवहार करू नका
कॅफे, मॉल, स्टेशन इथल्या फ्री Wi-Fi नेटवर्कवर आर्थिक व्यवहार केल्यास, तुमची माहिती सायबर गुन्हेगारांना मिळू शकते. त्यामुळे खाजगी आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शनवरच बँकिंग व्यवहार करा.
सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक चलाखीने सामान्य नागरिकांना फसवत आहेत. याचा अडथळा ठरू शकतो फक्त जागरूक नागरिक! पासवर्डच्या बाबतीत थोडी अधिक खबरदारी घेऊन आपण आपली मेहनतीची कमाई आणि वैयक्तिक माहिती वाचवू शकतो. सरकारच्या या सल्ल्याचं पालन केल्यास सायबर फसवणूक टाळणं अधिक सोपं होईल.
पासवर्ड मजबूत कसा असावा?
पासवर्डमध्ये मोठी व छोटी अक्षरे, संख्या आणि स्पेशल कॅरेक्टर्स असावेत, आणि तो किमान ८ अक्षरांचा असावा.
मी एकाच पासवर्डचा वापर सर्व खात्यांसाठी करू शकतो का?
नाही, प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड वापरणे सुरक्षित असते.
पासवर्ड किती वेळा बदलावा?
दर काही महिन्यांनी किंवा शक्यतो दर ३ ते ६ महिन्यांनी पासवर्ड बदलावा.
सार्वजनिक Wi-Fi वर आर्थिक व्यवहार करणे कितपत सुरक्षित आहे?
सार्वजनिक Wi-Fi वापरून व्यवहार करणे अत्यंत धोकादायक असते, त्यामुळे ते टाळावे.
OTP किंवा PIN शेअर केल्यास काय धोका होतो?
OTP किंवा PIN शेअर केल्यास फसवणूक करणाऱ्यांना तुमचे पैसे चोरणे सोपे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.