Online Scam : LinkdIn युजर्स ठरत आहेत स्कॅमर्सचे बळी; असा करा बचाव

LinkdIn
LinkdInSakal

LinkdIn Online Scam : ऑनलाइन प्लॅटफॉर्म लिंक्डइन हे प्रोफेशनल युजर्समध्ये एक प्रसिद्ध नाव असून, या प्लॅटफॉर्मचा वापर सहसा अनेक जण नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित माहितीसाठी करतात. पण, आता या प्लॅटफॉर्मचा वापर करून घोटाळेबाज युजर्सला बळी बनवत आहेत. यासाठी स्कॅमर मालवेअर आणि स्पायवेअर असलेल्या लिंकद्वारे युजर्सना लक्ष्य करत आहेत. या लिंक्सवर युजर्सने क्लिक करताच त्यांची वैयक्तिक माहिती स्कॅमर्सपर्यंत जाते आणि ते सहजपणे बळी पडतात.

LinkdIn
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

साधारणता लिंक्डइनवर रिक्वेस्ट स्वीकारणे सोपे असते त्याचाच फायदा घेत स्कॅमर युजर्सना रिक्वेस्ट पाठवतात आणि तिचा स्वीकार झाल्यानंतर संबंधित युजरचा विश्वास संपादित करून मालवेअर आणि स्पायवेअर असलेली लिंक पाठवतात. यावर संबंधित युजरने क्लिक करताच हे स्पायवेअर यूजर्सच्या डिव्हाईसमधील डेटा चोरण्यास सुरुवात करतात. यामध्ये प्रामुख्याने नाव, बँकेचा तपशील, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड आदींची माहिती स्कॅमरना पाठवली जाते. त्यामुळे गुन्हेगारांना फसवणूक करणे सोपे जाते.

याबाबत क्लॉडसेकने याबाबतचा अहवालही प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, या प्रकारची फसवणूक लिंक्डइनवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. हे एक प्रोफेशनल व्यासपीठ असल्याने घोटाळेबाज सहजपणे युजर्स फसवणुकीचे बळी पडत आहे.

LinkdIn
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

अशी बाळगा सावधगिरी

लिंक्डइनवर सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणत्याही अज्ञात रिक्वेस्टचा स्वीकार करू नये. जर तुम्ही अशा प्रकारच्या रिक्वेस्ट स्वीकारत असाल तर, त्या स्वीकारण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करून मगच तिचा स्वीकार करावा. याशिवाय इनबॉक्समध्ये आलेल्या कोणत्याही फाईल्स डाउनलोड करण्यापूर्वी आणि उघडण्यापूर्वी स्कॅन कराव्यात. माहिती नसलेल्या फाइल्स आणि दस्तऐवज डाउनलोड करणे आणि त्या सेव्ह करणे शक्यतो टाळावे.

LinkdIn
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com