

IISc researchers, including astronaut Shubhanshu Shukla (left) and lead author Swati Dubey (right), examine bacteria-based space bricks in the lab using Bengaluru soil isolate and Martian soil simulant for future Mars habitats (Credit: Aloke Lab, IISc).
esakal
बेंगळुरूच्या मातीत लपलेला चमत्कार समोर आला आहे. मंगळावर मजबूत विटा बनवण्याची आशा जागी झाली आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आणखी एक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. फक्त अंतराळात उड्डाणच नाही, तर विज्ञानातही त्यांचे योगदान आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे. बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधील शास्त्रज्ञांच्या टीमसोबत त्यांनी केलेले संशोधन PLOS One या नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.