सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.
Todays Gold and silver prices
Todays Gold and silver pricessakal

आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आज तर सोने चांदीच्या दरात लक्षणीय घसरण दिसून आली. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. (Gold silver update 30 june 2022)

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,750 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,000 रुपये आहे तर आज चांदीच्या दरातही घसरण झाली असून 10 ग्रॅम चांदीचा दर 594 रुपये आहे. (Todays Gold, Silver price Updates)

Todays Gold and silver prices
GST Council Meeting: वाढता टॅक्स लावणार खिशाला कात्री, हॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 51,090 रुपये

दिल्ली - 51,050 रुपये

हैदराबाद - 51,000 रुपये

कोलकत्ता - 51,000 रुपये

लखनऊ - 51,150 रुपये

मुंबई - 51,000 रुपये

नागपूर - 51,030 रुपये

पूणे - 51,030 रुपये

Todays Gold and silver prices
Campus Activewear Stock ला आउटपरफॉर्म रेटिंग, नवीन टारगेट किती ?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Todays Gold and silver prices
गुंतवणूकदारांना मोठा फटका, सलग दोन दिवस शेअर बाजारात घसरण

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com