
तुम्ही तुमच्या स्थानिक दुकानातून काही वस्तू खरेदी केल्यानंतर शक्यतोवर ऑनलाईम पेमेंटचा मार्ग निवडता कारण यूपीआय मुळे डिजिटली पेमेंट करणे खूपच सोपे झाले आहे. अशात जर पेमेंट करताना मेसेजिंग ची सुविधा मिळाली तर पैश्याची योग्य देवाणघेवाण झाली की नाही, हे सहज कळते. WhatsAppने आता ही गोष्टी सहज शक्य केली आहे.
WhatsApp वरुन पैसे पाठवणे हे आता मेसेज पाठवण्यासारखे सोपे आहे. यामध्ये आता युजर्सला यूपीआय पेमेंट्स त्यांच्या चॅटवरुन सहज करता येईल. आज आम्ही तुम्हाला अशा चार सोप्या स्टेप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला WhatsApp वरुन UPI Payment करणे सहज शक्य होईल.
स्टेप 1 -
तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे त्याचे चॅटबॉक्स उघडा आणि पेमेंट्स आयकॉन वर टॅप करा.
त्यानंतर अटॅच वर टॅप करुन पेमेंट वर टॅप करा. Add Bank करा आणि Verify करा
तुम्हाला जितके रुपये पाठवायचे आहेत ते लिहा त्यानंतर Next वर टॅप करा
त्यानंतर गेट स्टार्टेड वर टॅप करा.
बँकेच्या लिस्टपैकी तुमच्या बँकेच्या नावावर टॅप करा.
व्हेरिफाय एसएमएस वर टॅप करा. अलाऊ वर टॅप करा.
तुम्हाला WhatsApp वरुन पैसे पाठवायचे आहेत त्या बँकेच्या अकाऊंटवर जा.
डेबिट कार्ड व्हेरिफाय करुन कंटिन्यू वर टॅप करा. कार्डाचे डिटेल्स तपासासाठी व्हेरिफाय कार्डवर टॅप करा.
स्टेप 2-
तुम्ही WhatsAppवर बँक अकाऊंट Add केल्यानंतर तुम्ही कोणत्याही काँटॅक्टला पैसे पाठवू शकता.
ज्या कॉन्टॅक्ट ला पैसे पाठवायचे आहेत त्याचे चॅट ओपन करा
रुपये चिन्हावर टॅप करा (पेमेंट्स आयकॉन)
तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे ती तिथे लिहा आणि नेक्स्ट वर टॅप करा. पैसे पाठवा.
स्टेप 3 -
युपीआय पिन टाकून तुम्ही पेमेंट व्हेरिफाय करा
पैसे पाठवण्यापूर्वी तुम्हाला युपीआय पिन कन्फर्म करण्यास सांगण्यात येईल.
जर तुम्ही युपीआय पिन अजूनही सेट केला नसेल तर तुम्हाला तो करायला सांगण्यात येईल, याकरीता तुम्हाला डेबिट कार्डाचे शेवटचे सहा अंक आणि कार्ड संपण्याची अंतिम मुदत तारीख टाकावी लागेल.
स्टेप 4
जर तुम्हाला पेमेंट प्रोसेस पुर्ण झाली की नाही याविषयी शंका असेल तर तुम्ही ही शंका दूर करी शकता.
तुम्ही चॅटमध्ये जाऊन पैसे ट्रान्सफर झाल्याचे स्टेटस जाणून घेऊ शकता किंवा पेमेंट सेंटीग्ज मध्ये जाऊन पेमेंट हिस्ट्री जाणून घेऊ शकता.
याशिवाय WhatsAppवरील पेमेंट्सच्या अधिक माहिती करीता https://www.whatsapp.com/payments/in या संकेत स्थळला तुम्ही भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.