esakal | Instagram स्टोरीज अपलोड करा मोबाइल अ‍ॅप न उघडता, वापरा 'ही' ट्रिक
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram-logo

Instagram स्टोरीज अपलोड करा मोबाइल अ‍ॅप न उघडता, वापरा 'ही' ट्रिक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या मोबाईल अ‍ॅप्सपैकी इन्स्टाग्राम हे एक आहे. जगभरातून कोट्यावधी वापरकर्ते इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेयर करतात, जे 24 तासांनंतर आपोआप गायब होतात. समजा जर या स्टोरीज तुमच्या मोबाईलमधील इंस्टाग्रामचे अ‍ॅप न उघडता अपलोड करता आली तर? हे बर्‍याच जणांसाठी खूपच सोयीचे होईल. म्हणूनच आज आपण अशी ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण इंस्टाग्रामचे अॅप न उघडता देखील स्टोरी अगदी सहज अपलोड करू शकाल. तसेच तुम्ही इन्स्टाग्राम स्टोरी इतर मित्रांना पाठवू शकाल.

अशा करा स्टोरीज अपलोड

  • मोबाईल अ‍ॅप न उघडता स्टोरीज अपलोड करण्यासाठी प्रथम आपल्या स्मार्टफोनवर थ्रेड्स फ्रॉम इन्स्टाग्राम अ‍ॅप डाउनलोड करा

  • डाउनलोड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोबाइल अॅप उघडा

  • अ‍ॅप उघडताच लॉगिन प्रक्रिया आपोआप पूर्ण होईल

  • यानंतर तुम्हाला कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये एक्सेस करण्याची परवानगी मागितली जाईल, ती द्या

  • येथे आपल्याला तीन पर्याय मिळतील, ज्यात प्रथम See Other Stories, दूसरा Upload Own Stories आणि तीसरा DMs हा पर्याय असेल

  • यामधून दुसरा पर्याय निवडा

  • येथून आपण एका क्लिकवर आपल्या स्टोरीज शेयर करु शकता. या व्यतिरिक्त आपल्याला येथे फिल्टर, स्टिकर्स आणि कॅप्शन देखील सापडतील जे आपण आपल्या स्टोरीजमध्ये वापरू शकता.

हेही वाचा: 'या' क्रमाकांवरुन मेसेज आला असेल तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

इंस्टाग्रामचे लाईव्ह रुम फीचर

मार्चमध्ये इन्स्टाग्रामने आपल्या वापरकर्त्यांसाठी लाईव्ह रुम फीचर सुरू केले. या फीचरच्या मदतीने लाईव्ह दरम्यान क्रियटर एकाचवेळी चार लोकांशी कनेक्ट होऊ शकतात. हे फीचर वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल असा कंपनीचा विश्वास आहे. लाइव्ह रूम फीचरच्या मदतीने लाइव्ह टॉक शो, मुलाखती घेणे अधिक क्रिएटीव्ह पध्दतीने करता येणार आहे.

हेही वाचा: टेक्नोहंट : नवे 5G मोबाईल

loading image
go to top