Smartphone as Remote Control: अहो ठिके ना... रिमोटच हरवला आहे ना... आपल्या मोबईल वरुन टीव्ही ऑपरेट करा

दुसऱ्या क्षणाला दुकानात जाऊन दूसरा रिमोट आणेपर्यंत तुमचा आवडता शो तर मिस झाला ना राव...
Remote on Smartphone
Remote on Smartphoneesakal

How to control tv with smartphone : हे जर तुमच्या सोबत घडलं नसेल तर तुम्ही फारच ऑर्गनाइज्ड आहात बाबा, पण खरं सांगू का हे जरा अशक्य आहे, अगदी OCD असलेल्या माणसाला सुद्धा आपण रिमोट कुठे ठेवलाय हे सांगता येत नाही.

त्यात जरा ठगास ठग म्हणजे आपल्या घरातली लहान मुलं...१० मिनिटांसाठी टीव्ही बघतील आणि घराच्या कोणत्यातरी वेगळ्याच कोपऱ्यात रिमोट टाकून देतील आणि बरं परत नक्की कुठे ठेवला आहे हेही सांगणार नाही.

कधी कधी तर आपल्याच कडून रिमोट पडून तुटतो किंवा काम करणं बंद होतं, मग अगदी देसी स्टाइल त्याला कितीही फटके मारले तरी तो पठ्ठ्या काही सुरु होत नाही. अशावेळेस दुसऱ्या क्षणाला दुकानात जाऊन दूसरा रिमोट आणेपर्यंत तुमचा आवडता शो तर मिस झाला ना राव

Remote on Smartphone
Google Smartphone: iPhone च्या स्पर्धेत आता गूगल उतरणार? लवकरच गूगल आणणार हा स्मार्टफोन, फिचर्सही तुफान

तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आपला रिमोट नसतांना सुद्धा आपला टीव्ही ऑपरेट करु शकतात, चेष्टा वाटते आहे? अहो नाही खरंच... तुम्ही आपल्या फोनवर काही सेटिंग्स करुन हे बदल करु शकतात कसे? बघूयात याच्या स्टेप्स :

Remote on Smartphone
Smartphone Tips : मोबाईल डेटा लवकर संपतो? या सेटिंग्ज ताबडतोब बदला

१. हे फिचर OnePlus, iQOO, POCO आणि Xiaomi सारख्या अनेक कंपन्यांचे फोन IR Blaster म्हणजेच Infrared Blaster सोबत देतात. ज्याच्यामुळे, फोन सहजपणे टीव्ही रिमोट म्हणून वापरला जाऊ शकतो.

Remote on Smartphone
Xiaomi Smartphone : Xiaomi 13 Series मध्ये लॉंच झाले हे ३ भन्नाट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

२. जर तुमच्या फोनला IR सपोर्ट असेल पण प्री-लोड केलेले रिमोट अॅप नसेल. तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन युनिव्हर्सल टीव्ही रिमोटसारखे अॅप डाउनलोड करु शकता. जर तुमच्याकडे Xiaomi किंवा Redmi ब्रँडचा फोन असेल तर त्यामध्ये MI रिमोट अॅप प्रीलोडेड आहे. ते उघडल्यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला + आयकॉन दिसेल.

Remote on Smartphone
Smartphone Theft : मोबाईल चोरी झाल्यास असं थांबवा UPI पेमेंट, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

३. हे उघडल्यानंतर टीव्ही, एसी, सेट टॉप बॉक्स असे अनेक पर्याय दिसतील. इथे तुम्हाला टीव्ही निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला टीव्हीचा ब्रँड निवडावा लागेल आणि पुढील प्रक्रिया करावी लागेल.

Remote on Smartphone
Smartphone Tips : आला 7GB RAM असलेला भारतातला सर्वात स्वस्त फोन, किंमत 8 हजारांपेक्षा कमी

जर तुमच्या फोनमध्ये IR ब्लास्टर नसेल तर?

जर तुमच्या फोनमध्ये IR ब्लास्टर नसेल. परंतु, तुम्ही Android TV वापरत असाल, तर फक्त Google TV अॅप इंस्टॉल करणे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

यासाठी तुम्हाला अॅप उघडावे लागेल आणि तळाशी उजवीकडे रिमोटवर टॅप करावे लागेल. यानंतर, तुम्हाला वरुन डिव्हाइसेससाठी स्कॅनिंगवर टॅप करावे लागेल. मग तुम्हाला तुमचे डिव्हाइस निवडावे लागेल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Remote on Smartphone
Smartphone Tips : स्पॅम कॉलच्या कटकटीमुळे आलाय वैताग? तुमच्यासाठी खास टिप्स

कोणत्या TV वर हे होऊ शकतं

जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल तरच हे होऊ शकतं असं काही नाही; अनेकांचा हा समज आहे पण असं काही गरजेचं नाही, तुमच्या साध्या टीव्हीवर सुद्धा तुम्ही फोनने ऑपरेट करु शकतात.

Remote on Smartphone
Made in India iPhone: 'मेड इन इंडिया' आयफोनला मोठी मागणी! ६५ टक्क्यांनी वाढली विक्री

iPhone साठी कशी आहे सेटिंग? (How use iphone as tv remote?)

1. तुमचा iPhone आणि TV किंवा स्ट्रीमिंग डिव्हाइस एकाच नेटवर्कवर असल्याची खात्री करा

2. control बटणवर जा

3. AirPlay साइन किंवा रिमोट कंट्रोल निवडा

4. कंट्रोल करण्यासाठीचा तुमचा टीव्ही निवडा

5. तुमचा टीव्ही नियंत्रित करा

Remote on Smartphone
Smartphone Vision Syndrome : " चक्क तेवढ्या वेळासाठी मी आंधळी झाले होते.." स्मार्टफोनचा अतिवापर पडला महाग

नॉन-स्मार्ट टीव्हीसाठी आयफोन रिमोट म्हणून वापरू शकतो का?

तुम्ही Apple TV 4K डाऊनलोड केल्यास हे होऊ शकतं. नाहीतर, तुमचा iPhone रिमोट म्हणून वापरण्यासाठी तुम्हाला एक वेगळे अॅप डाउनलोड करावे लागेल, जसे की युनिव्हर्सल रिमोट अॅप किंवा फायर टीव्ही किंवा Roku टीव्ही.

जरी नवीन फायर टीव्ही स्मार्ट टेलिव्हिजन एअरप्लेला समर्थन देत असले तरी फायर टीव्ही स्टिक आणि क्यूब एअरप्लेशी सुसंगत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com