Hyundai ने लाँच केली लहान आकाराची व्हॅन, मिळेल ९४० लीटरचे बूट स्पेस

ग्राहकांमध्ये ती पसंतीस उतरली आहे.
Hyundai Casper Van
Hyundai Casper Vanesakal

नवी दिल्ली - दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने गेल्या वर्षी आपल्या घरच्या बाजारपेठेत ह्युंदाई कॅस्पर अल्ट्रा (Hyundai Casper) काॅम्पॅक्ट कार सादर केली होती. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिचा लहान आकार आणि चांगल्या कॅबिनमुळे शहरी ग्राहकांमध्ये ती पसंतीस उतरली आहे. यामुळे कंपनीने बाजारात कॅस्पर व्हॅन (Hyundai Casper Van) सादर केले आहे. बाहेरुन ह्युंदाई (Hyundai) कॅस्पर व्हॅन आपल्या छोट्या व्हर्जन प्रमाणे दिसते. त्यात डीआरएलसह एलईडी हेडलाईट्स, क्लीन रेडिएटर ग्रिल आणि एक मोठी स्किड प्लेट देण्यात आले आहे. मात्र कॅस्पर व्हॅन आपल्या नियमित माॅडलचे २ सीटर व्हर्जन आहे. यामुळे तिच्यात खूप बूट स्पेस मिळते. रिअर सीट्स नसल्याने या व्हॅनमध्ये ९४० लीटरचे बूट दिले गेले आहे. बातम्यांनुसार ह्युंदाई रिअर विंडोजवर मेटसची बारही दिले गेले आहे. मागील सामान काचेच्या खिडक्यांना आदळणार नाही. (Hyundai Launched Casper Van With 2 Seat)

Hyundai Casper Van
Maruti S Presso चे सीएनजी व्हेरिएंट खरेदी करा ५९ हजार देऊन, द्या इतका ईएमआय

हे आहेत फिचर्स

फिचर्सविषयी बोलाल तर कॅस्पर व्हॅनमध्ये ४.२ इंचाचे डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले गेले आहे. त्यात यूएसबी पोर्ट आहे आणि ब्लूटूथ जोडणीही मिळते. कॅस्पर आणि कॅस्पर व्हॅन अॅडव्हान्स्ड असिस्टन्स सिस्टिम फिचर्ससह मिळते. या फिचरमध्ये लेन किप असिस्ट, फाॅवरवर्ड-कोलिजन वाॅर्निंग आणि क्रूझ कंट्रोलसारख्या सुविधा मिळतात. त्या बरोबरच कारमध्ये हिटेड स्टेअरिंग व्हिल, प्रीमियम अपहोल्ट्री आदी पर्यायी फिचर्सही आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com