Maruti S Presso चे सीएनजी व्हेरिएंट खरेदी करा ५९ हजार देऊन, द्या इतका ईएमआय

सीएनजी किटसह येणारी एकमेव मायक्रो एसयूव्ही कार
Maruti S Presso LXI CNG Variant on EMI
Maruti S Presso LXI CNG Variant on EMIesakal

नवी दिल्ली : देशाच्या कार सेक्टरमध्ये आता पेट्रोल आणि डिझेल कार व्यतिरिक्त सीएनजी कारचीही मागणी चांगल्या प्रकारे वाढल्याचे दिसत आहे. ही मागणी पाहून वाहन निर्मात्या कंपन्यांनी आपल्या कारचे सीएनजी व्हर्जन लाँच करण्यास सुरुवात केले आहे. त्यात आम्ही बोलत आहोत आज मायक्रो एसयूव्ही सेगमेंटची एक आकर्षक डिझाईनवाली एसयूव्ही मारुती एस स्प्रेसोच्याविषयी (Maruti S Presso). ती सीएनजी किटसह येणारी एकमेव मायक्रो एसयूव्ही आहे. मारुती (Maruti) एस स्प्रेसो सीएनजीची सुरुवातीची किंमत पाच लाख २४ हजार रुपये (एक्स शोरुम, दिल्ली) आहे. रस्त्यावर येईपर्यंत पाच लाख ९१ हजार ३०६ रुपये होते. जर तुम्ही या सीएनजी किट असणारी मायक्रो एसयूव्ही खरेदी करु इच्छित असाल तर जाणून घ्या सहज डाऊन पेमेंटवर घरी घेऊन जाण्याचा पूर्ण तपशील. (Maruti S Presso LXI CNG Variant on EMI)

Maruti S Presso LXI CNG Variant on EMI
नवीन Maruti Balenoची बुकिंग सुरु, लाँच कधी होणार जाणून घ्या

ऑनलाईन डाऊन पेमेंट आणि ईएमआय कॅलक्युलेटनुसार, जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करता तर कंपनीशी संलग्न बँक त्यावर ५ लाख ३२ हजार ३०६ रुपयांचे कर्ज देईल. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला ५९ हजार रुपये कमाल डाऊन पेमेंट द्यावे लागेल. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ११ हजार २५८ रुपये महिन्याला ईएमआय (EMI) द्यावे लागेल. हे कर्ज फेडण्याचा अवधी बँकने ६९ महिन्यांचे म्हणजे पाच वर्ष निश्चित केले आहे. या कर्जाच्या रक्कमेवर बँक ९.८ टक्के वार्षिक दराने व्याज लावेल. जर तुम्ही ही मारुती एस स्प्रेसोला सदरील डाऊन पेमेंट प्लॅन वाचल्यानंतर खरेदी करत असाल तर जाणून घ्या या कारचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनचे पूर्ण तपशील

Maruti S Presso LXI CNG Variant on EMI
Tata Group चे हे दोन शेअर्स देतील भरपूर नफा

मारुती एस स्प्रेसोचे इंजिन आणि पाॅवरविषयी बोलाल तर यात ९९८ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. जे १ लीटर पेट्रोल इंजिन जे ६८ पीएसचे पाॅवर आणि ९० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. कारच्या फिचर्सविषयी म्हणाल तर त्यात अँड्राॅईड ऑटो आणि अॅपल कार प्लेची कनेक्टिव्हिटी असणारा ७ इंचाचे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिले गेले आहे. या व्यतिरिक्त किलेस एंट्री, ड्रायव्हर साईड एअरबॅग, एबीएस, ईबीडी, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमांडर आदी फिचर्स दिले गेले आहे. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही पेट्रोल वर २१.४ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते. आणि सीएनजीवर ३१.२ किलोमीटर प्रतिकिलो मायलेज देते.

सूचना - या कार वर मिळणारे कर्ज, डाऊन पेमेंट आणि व्याज दराचे प्लॅन तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोरवर आधारित आहे. त्यात निगेटिव्ह रिपोर्ट झाल्यावर बँक या तिन्हींबाबत बदल करु शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com