
Shubhanshu shukla space station exercise fitness video
esakal
Shubhanshu shukla space exercise video : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ स्थानकात फिट राहण्याचे अनोखे तंत्र उलगडले आहे. मायक्रोग्रॅव्हिटीच्या वातावरणात स्नायू आणि हाडांचे नुकसान टाळण्यासाठी व्यायामाची गरज त्यांनी अधोरेखित केली. नुकत्याच केलेल्या एका X पोस्टमध्ये त्यांनी अंतराळातील व्यायामाची पद्धत सांगितली जिथे पारंपरिक व्यायाम उपकरणे वापरता येत नाहीत. "अंतराळात व्यायाम करायचा आहे? सोपं आहे, जिम मेंबरशिपची गरज नाही," असे त्यांनी मजेशीरपणे म्हटले.