Sunita Williams’ Space Mission: पुन्हा एकदा सुनीता विल्यम्सची अवकाश यात्रा टळली, शेवटच्या क्षणाला अंतराळ मोहीम रद्द

Sunita Williams Space Mission Canceled: नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरवरुन भारतीय वशांच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून उड्डाण करणार होत्या, पण ही मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.
Sunita Williams
Sunita Williams

नवी दिल्ली- भारतीय वशांच्या सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा एकदा टळली आहे. स्पेसक्राफ्ट उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असताना ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरवरुन भारतीय वशांच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून उड्डाण करणार होत्या, पण ही मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.

बोईंग स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुन्हा काही दिवसात ही मोहीम पुन्हा अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं नासाच्या अधिकाऱ्यांन सांगितलं. विशेष म्हणजे याआधीही मोहिमेमध्ये अडथळा आला होता. शेवटच्या क्षणी मोहीम रद्द करण्याचा निर्णय घ्याला लागला होता.

Sunita Williams
NASA: तब्बल 189 कोटी खर्च करून नासा बनवणार खास 'टॉयलेट'; अंतराळवीरांना होणार मोठी मदत..जाणून घ्या

सुनीता विल्यम्स या बुट्स विलमोरे यांच्यासोबत बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात जाणार होत्या. जर त्यांची आजची मोहीम यशस्वी ठरली असती तर ते ऐतिहासिक ठरलं असतं. कारण, बोईंगच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळारवीर अंतराळात जाण्याची ही पहिली वेळ असली असती. पण, तूर्तास या ऐतिहासिक घटनेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बोईंग स्टरलाइनरची निर्मिती अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी आणि त्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी करण्यात आली आहे. अंतराळामध्ये मानवी जीवन आणि संशोधन यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. यासंदर्भात अनेकदा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Sunita Williams
NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

सुनीता विल्यम्स आणि बुट्स विलमोरे हे अनुभवी अंतराळवीर आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक आठवड्याच्या काळासाठी राहणार होते. शिवाय या मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण आणि विश्लेषण नासाकडून करण्यात येणार होते. पण, सध्या ही मोहीम टळली आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या अंतराळात जाणार असल्याने याकडे भारतीयांचे देखील लक्ष लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com